पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याचे स्वागत
पंढरपूर (प्रतिनिधी) अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी करिअरच्या अनेक संधी विविध क्षेत्रात उपलब्ध आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच भविष्यातील गोष्टींचे नियोजन निश्चित करा. चांगल्या सवयी तुम्हाला यश देत असतात. त्यामुळे प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या सुरवातीपासून तुम्ही ध्येय ठरवा आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी स्मार्ट अभ्यास करा. हे सर्व करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम आयुष्यात नेमकं काय करायचे आहे ते ठरविले पाहिजे. असे मत प्रा. आय. आय. मुजावर यांनी पंढरपूर सिंहगड मध्ये बोलताना व्यक्त केले.
कोर्टी, (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात प्रथम वर्षं अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, प्रमुख पाहुणे प्रा. आय. आय. मुजावर, डॉ. रविंद्र व्यवहारे, डॉ. चेतन पिसे, प्रा. समिर कटेकर, प्रा. अनिल निकम यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
प्रमुख पाहुणे प्रा. मुजावर यांचे स्वागत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यातआला. दरम्यान प्रथम वर्षं अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम यांनी प्रथम वर्षातील शैक्षणिक आढावा सांगुन विशेष मार्गदर्शन केले. ट्रेनिंग अँड प्लेसमेन्टचे प्रा. समिर कटेकर यांनी नोकरी मिळविण्यासाठी प्रथम वर्षापासून संघर्ष करा म्हणजे शेवटच्या वर्षी तुम्हाला यश निश्चित मिळेल असे मत व्यक्त केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
ॲकॅडमी डीन डॉ. रविंद्र व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात हार्डवर्क घेतल्यास यश निश्चित मिळते. महाविद्यालयातील प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा असतो या स्पर्धेतुन तुम्हाला नव-नवीन संकल्पना सुचतात त्या संकल्पनेतून तुमच्या ज्ञानात भर पडते. असे मत डॉ. व्यवहारे यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी, घडविण्यासाठी शिक्षकांची खुप तळमळ असते त्या तळमळीने विद्यार्थ्यांने शिकले पाहिजे, असे मत व्यक्त केले. प्रा. मुजावर यांचे विविध विषयांवर ३ टप्यात विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा. शिवाजी पवार यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. आप्पासाहेब ढाणे यांनी मानले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________





0 Comments