स्वेरीने केली अनोखी रक्षाबंधन साजरी



                                                         पालवी’ला दिला मेसातील विद्यार्थ्यांनी मदतीचा हात!



पंढरपूर- (संतोष हलकुडे) रक्षाबंधन ! तसा भाऊ-बहिणीच्या अनोख्या नात्याचा दिवस! सर्वत्र विविधतेने व उत्साहात साजरा करत असल्याचे पाहतो. अनेक भाऊ हे या पवित्र सणाच्या निमित्ताने बहिणीसाठी महागड्या वस्तू, साडी, भेट वस्तू ओवाळणी म्हणून देत असतात. 

परंतु नेहमी विविध उपक्रम करून समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या स्वेरीतील  विद्यार्थी मात्र याहून वेगळे कार्य करून समाजापुढे एक नवा आदर्श उभा केलाय. याचेच पंढरपूर पंचक्रोशित मुक्तकंठाने कौतुक होत असून स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. 

याचे झाले असे ! भारताचा ७३ वा ‘स्वातंत्र्य दिन’ आणि ‘रक्षा बंधन’ हा योगायोगाने एकाच दिवशी आलेला  उत्सव! त्यामुळे ध्वजारोहणानंतर मिळालेली सुट्टी स्वेरीच्या ‘मेसा’ (मेकॅनिकल इंजिनीअरींग स्टुडंट्स असोसिएशन) च्या विद्यार्थ्यांनी चांगलीच उपयोगात आणली. अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील ‘मेसा’च्या साधारण १५० विद्यार्थ्यांनी कोर्टी रोडला असलेल्या ‘पालवी’कडे मार्गस्थ झाले. ‘पालवी’च्या आवारात चिमुकली मुले खेळत होती, बागडत होती आणि अचानक आलेल्या विद्यार्थ्यांना पाहून मुले स्तब्ध झाली. 



_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



काही समजण्याच्या आत स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी सभागृहातच कार्यक्रम घेण्याचे ठरविले. सुरुवातीला स्वेरीच्या प्रा. सचिन गवळी यांनी प्रास्तविक करून ‘रक्षाबंधन’ पालवी मध्ये का साजरा करायचा ? हे सांगितले. या निमित्ताने मेसाचे विद्यार्थी उपाध्यक्ष विकास धुमाळ, सिद्धेश्वर खपाले, प्रतिक इंगळे, अक्षय टकले, रोहित आदलिंगे यांनी देखील पालवीमध्ये येण्याचे प्रयोजन सांगितले. 

यानंतर चिमुकल्याच्या चेहऱ्यावर उत्साह वाढत होता. पालवीच्या संस्थापिका सौ. मंगल शहा व सचिवा डिंपल घाडगे यांनी पालवीच्या वाटचालीचे सविस्तर माहिती सांगितली व मनोगतातून स्वेरीच्या प्रयोजनाबाबत चिमुकल्यांना सांगून स्तुत्य उपक्रमाबद्धल गौरवोदगार काढले. यानंतर ‘पालवी’चा वचननामा सादर केला. 

ज्यामध्ये पालवीमधील विद्यार्थ्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या यांचे वर्णन केले होते. त्या भावपूर्ण वचननाम्याने प्राध्यापक व स्वेरीतून आलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर शहारे उमटले. यानंतर रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला. पालवीच्या चिमुकल्यांनी विठ्ठल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या. यावेळी खाऊवाटपाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी पालवीत चिमुकल्या हातांनी बनविलेल्या वस्तूही विद्यार्थ्यांनी विकत घेतल्या. याप्रसंगी स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी बाजारातून महागड्या राख्या विकत घेणे टाळून पालवीतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आकर्षक राख्या घेतल्या. 


_________________________________________________


_________________________________________________


त्याच बरोबर चिमुकल्यांना मदत म्हणून मिक्सर, कुकर, लेखनाचे साहित्य, वह्या, पुस्तके आदी मिळून जवळपास सात हजार रुपयांचे योगदान स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी पालवीसाठी दिले. वायफळ खर्च न करता स्वेरीतील विद्यार्थ्यांनी पैशाचा सदुपयोग व्हावा या हेतूने पालवीतील चिमुकल्यांसाठी खर्च केला. संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांनी पालवीतील चिमुकल्याबरोबर घालविला.

 स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. सचिन सोनवणे, मेसा समन्वयक प्रासंजय मोरे, प्रा. अविनाश पारखे, प्रा. अभिजित शिंदे, प्रा. अविनाश मोटे, प्रा. शशिकांत जाधव, प्रा.प्रज्ञा भुसे, प्रा. श्रीकृष्ण भोसले, इतर प्राध्यापक वर्ग यांच्यासह जवळपास १५० विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार गोरे यांनी  केले तर‘मेसा’चे विद्यार्थी अध्यक्षा शुभदा म्हेत्रे यांनी आभार मानले.पवित्र हाताने बांधलेल्या राख्या आणि चिमुकल्यांनी दिलेले प्रेम पाहून स्वेरी आणि ‘पालवी’ यांच्यातील नाते या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आणखी भक्कम झाले. हे मात्र नक्की. 



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments