पंढरपूर- भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकीच्या पदवीच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत व पदविका महाविद्यालयातील असे मिळून दोन महाविद्यालयाच्या तब्बल १०६ विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पदवी अभियांत्रिकी विभागातील कार्यशाळेमध्ये तसेच डिप्लोमा अभियांत्रिकीमध्ये असे मिळून दोन्ही बाजूला संपूर्ण दिवसभर स्वतंत्रपणे रक्तदान सुरु होते. स्वेरीच्या या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत देश निर्मितीच्या कार्यात विद्यार्थ्यांनी मोलाचा हातभार लावला. यु.पी. एस. सी. स्पर्धा परीक्षेच्या सेन्ट्रल आर्म्ड पोलीस फोर्सच्या परीक्षेत मुलींमध्ये भारतात प्रथम आलेल्या आणि असिस्टंट कमांडंटपदी विराजमान झालेल्या प्रियांका भोसले यांच्या हस्ते या डिग्री इंजिनीअरिंगच्या तर डिप्लोमा इंजिनीअरिंगच्या बाजूला विश्वस्त प्रा. सुरज रोंगे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व अधिष्ठाता, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. यासाठी सोलापूर ब्लड बँक व सोलापूर व पंढरपूर ब्लड बँक, पंढरपूर यां रक्तपेढ्यांना डिग्री इंजिनिअरींगकडे तर डिप्लोमा इंजिनिअरींगकडे सोलापूरच्या सिद्धेश्वर ब्लड बँक याना पाचारण करण्यात आले होते. याप्रसंगी सुमारे दोन्ही महाविद्यालयातील १०६ विद्यार्थ्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला. विश्वस्त प्रा. सुरज रोंगे यांच्यासह अनेक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील रक्तदान केले. या कार्यक्रमासाठी रक्तपेढीचे डॉ.आदम शेख, डॉ. प्रसाद खाडिलकर यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ.आर.एन.हरिदास, प्रा. एस.एम.शिंदे, प्रा. एस. व्ही. जगझाप, प्रा. आर. पी. शिंदे, प्रा. एस.एम.काळे, प्रा. एम. एम. शिंदे, प्रा.ए.एम.कस्तुरे, प्रा. एन. एम.मस्के, प्रा. वाय. बी. पटेल व तसेच पदविका अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा. सुनिल भिंगारे यांच्यासह सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी व सहकाऱ्यांनी यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. यावेळी महसूल विभागचे मुख्य सचिव पितांबर भोसले, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम पवार, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________











0 Comments