पुणं दि. 11: पूर ओसरला असला तरीही नागरिकांनी पुराच्या दूषित पाण्यात जाण्याचे टाळावे, जेणेकरुन साथीचे आजार टाळता येतील, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरु हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लता संतोष त्रिंबके यांनी केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
पुणे महानगरपालिकेच्या वतीने पुरग्रस्तांसाठी वैद्यकीय तपासणी सुरु आहे. या दवाखान्यात पुरग्रस्तांची तपासणी व सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या अनुषंगाने औषधांची कमतरता भासू नये, यासाठी महापलिकेने दवाखान्यांना पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन दिला आहे. तसेच पाण्यामुळे उद्भवणारे लेप्टोस्पायरोसिस, विषाणुजन्य आजार, अतिसार, उलटी-जुलाब, ताप, सर्दी, खोकला या आजारांवरील पुरेसा औषधसाठा देखील हॉस्पीटलमध्ये ठेवण्यात आला आहे. पुरग्रस्तांना तात्काळ औषधोपचार देण्यासाठी आपत्कालीन सुविधा कक्ष 24 तास सुरु ठेवण्यात आला आहे. पूर ओसरल्यानंतर पुरग्रस्त घरी परतल्यामुळे सध्या दैनंदिन वेळेबरोबरच सुट्टयांदिवशी महापालिकेचे सर्व दवाखाने सुरु ठेवण्यात आले असून नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असेही डॉ. लता त्रिंबके यांनी सांगितले.
निवारा कॅम्पमधील सुमारे 350 नागरिकांची तपासणी 4 ऑगस्ट पासून करण्यात आली आहे.
_________________________________________________
_________________________________________________
निवारा केंद्रामधील पुरग्रस्तांसाठी वैद्यकीय अधिकारी, नर्स व मदतनीस या वैद्यकीय पथकामार्फत पूरग्रस्तांची तपासणी करुन औषधोपचार व आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिलयाचेही डॉ. त्रिंबके यांनी सांगितले.
कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये गर्भवती स्त्रियांसाठी सुसज्ज अँब्युलन्स उपलब्ध आहे. गर्भवती महिलेला प्रस्तुती कळा सुरु झाल्यावर हॉस्पीटलमध्ये जाण्यास त्वरीत वाहन उपलब्ध न झाल्यास 020-25508500 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास ही व्हॅन तात्काळ मोफत मिळेल. तसेच या व्हॅन द्वारे संबंधित महिलेला इच्छित हॉस्पीटलमध्ये पोहचविण्यात येईल. ही सेवा महापलिकेतर्फे मोफत व 24 तास पुरविली जाईल.
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments