पंढरपूर शहरातील मठ आणि धर्मशाळांच्या मालमत्ता धारकांमध्ये खळबळ... ट्रस्टच्या मालमत्तेची परस्पर विल्हेवाट.. करोडोंचा अपहार


पंढरपूर -  येथील संत मीराबाई महाराज शिरकर यांच्या मालकी वहिवाटीची सर्व्हे नं. 67/2 ब ही जमीन कांता गोपाळ डिंगरे उर्फ कांता शामराव बचुटे या महिलेने आपले नांव कांताबाई अमृतराव शिरकर, रा. सरकोली असे नांव लावून खोट्या मृत्युपत्राच्या आधारे तलाठी व सर्कल यांच्या संगनमताने कोर्टाने मृत्युपत्र अदखलपात्र केलेले असतानासुद्धा काही गुंड इसमांना हाताशी धरून संत मीराबाई महाराज शिरकर संस्थानची पंढरपूर शहरातील शिवाजी चौकातील मोक्याची कोट्यावधी रूपयांची मालमत्ता विकून करोडो रूपयांचा अपहार केल्याची माहिती नियोजित संत मिराबाई महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त ह.भ.प. वासुदेव महाराज शिरकर यांनी दिली.
_________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहरामध्ये शिवाजी चौकात संत मीराबाई महाराज संस्थानची तीन एकर एक गुंठा जागा अब्जावधी रूपयांची आहे. मात्र ती गत पन्नास वर्षापासून ट्रस्ट नोंदणीकृत होण्यासाठी कोर्टाच्या आदेशान्वये कोर्टामध्ये वादातित आहे. याचाच गैरफायदा घेत कांताबाई शिरकर नामाची बिरूदावली स्वतःस लावून घेणार्‍या एका भामट्या महिलेने या ट्रस्ट मालमत्तेतील अर्ध्याहून अधिक जागा आपणास या ट्रस्टचे मयत विश्‍वस्त अमृतराव रूपाजी शिरकर यांनी आपणांस मृत्युपत्राद्वारे दिल्याचे भासवून सदर मृत्युपत्र कोर्टात शाबीत करण्यासाठी सदरची महिला पंढरपूर येथील सिव्हील जज्ज ज्युनिअर डिव्हीजन यांचे कोर्टात गेली असता सदरचे मृत्युपत्र खोटे असल्याचे कोर्टात सिद्ध झाले. 
मात्र यावरही या महिलेने न थांबता सदरच्या खोट्या मृत्युपत्राच्या आधारे पंढरपुरचे गावकामगार तलाठी व मंडल अधिकारी यांच्याशी संगनमत करून आपले नांव सातबारा उतार्‍यावर पद्धतशीरपणे लावून घेतले. याउपर मा. तहसिलदार यांचेकडे चौकशी प्रलंबित असताना तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयात या मालमत्तेविषयी वाद चालू असताना या महिलेने मंडल अधिकार्‍यांच्या सांगण्यावरून सदरची मालमत्ता बेकायदेशीरपणे खरेदीखताद्वारे हस्तांतरीत करून करोडो रूपयांचा अपहार केल्याची फिर्याद नमूद संस्थानचे व्यवस्थापकीय संचालक ह.भ.प. वासुदेव महाराज शिरकर यांनी पंढरपूर शहर पोलिस स्टेशन, पोलिस अधिक्षक सोलापूर, मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांना तसेच माहितीस्तव मा. उपविभागीय अधिकारी यांना दिलेली आहे. 
या व्यवहारामुळे पंढरपूर शहरातील हजारो ट्रस्टच्या मठांच्या, धर्मशाळांच्या मालमत्ता धोक्यात आल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होते. तरीही प्रशासन यावर अद्यापही कोणतीही ठोस कारवाई करीत नसल्याचे दिसून येते. तसेच ट्रस्टच्या मालमत्तेचे पालक मा.धर्मादाय उपायुक्त सोलापूर हे या बाबतीत मूग गिळून गप्प बसले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पंढरपूर शहरात स्थावर मालमत्ता धारकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे, भाविक भक्तांमध्ये तसेच पंढरपूर नगरवासियांमध्ये कट्ट्याकट्ट्यावर चर्चा होत आहे. 


________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


________________________________________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments