व्यापक दृष्टीकोन हीच उत्तम आयुष्याची गुरुकिल्ली होय – डॉ. गिरिष जाखोटिया



पंढरपूर – “आर्थिक मजबूती, बौध्दीक सक्षमता, सांस्कृतिक आनंद व सामाजिक कार्य या चार बाबी माणसाच्या उत्तम आयुष्याची गुरुकिल्ली आहेत. विद्यार्थ्यांनी स्वत:चे आयुष्य उत्तम घडविण्यासाठी या चार घटकांवर विशेष लक्ष देणे अपेक्षित आहे. आपल्या आयुष्यात मित्रांचे महत्त्व खूप असून आपले मित्रमंडळ हे विविध स्तरातील मित्रांसह बनविले पाहिजे. प्रत्येकाच्या वैचारिकतेचा व दृष्टीकोनाचा सर्वांनाच फायदा होईल. सध्या सामाजिक क्षेत्रात महापुरुषांची झालेली वाटणी अत्यंत चुकीची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महापुरुषांना समजून घेवून वैश्विक पातळीवरील नागरीक होण्यासाठी प्रयत्नरत असले पाहिजे.” असे प्रतिपादन थोर अर्थतज्ज्ञ डॉ. गिरिष जाखोटिया यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर व कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रयत शताब्दी महोत्सवा’निमित्त आयोजित ‘उत्तम आयुष्याची गुरुकिल्ली’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर येथील दयानंद महाविद्यालयाच्या कॉमर्स विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर टोणपे, लक्ष्मी उद्योग समूहाचे प्रमुख संजीव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते



_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

 डॉ. गिरिष जाखोटिया पुढे म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून लक्ष दिले पाहिजे. शेती फायद्यात आणण्यासाठी त्याचे व्यवस्थापन बदलले पाहिजे. संघटीत नोकरदाराला जे आर्थिक लाभ मिळतात ते शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत. उत्पादन, विक्री व पुनर्प्रक्रिया या घटकाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी भावनिक घटकांमध्ये गुंतून न राहता वैचारिक प्रगल्भता येण्याच्या दिशेने कार्यरत राहिले पाहिजे. विविध क्षेत्रातील ज्ञान व माहिती समजून घेतली पाहिजे. सांस्कृतिक परंपरांमध्ये जास्त गुंतून न पडता व्यावहारिक दृष्टीकोन विकसित केला पाहिजे. सध्या सर्वच क्षेत्रात महागाई वेगाने वाढते आहे. हाच वेग पकडून आपण प्रगती साधली पाहिजे. तरच आपणास उत्तम आयुष्य जगता येईल.”

   अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. चंद्रशेखर टोणपे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करुन शिक्षण घेतले पाहिजे. यशामध्ये आत्मविश्वासाचा वाटा महत्वाचा असतो. यशाकडे वाटचाल करताना अनेकवेळा अपयश ही येते त्यामुळे खचून न जाता त्यातूनही शिकून पुढे जाता आले पाहिजे. ध्येयसिध्दीसाठी स्वत:ला तयार करता आले पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटील, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्यासारख्या समाजधुरीणांनी केलेल्या कार्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपला दृष्टीकोन व्यापक ठेवला पाहिजे.”    

_________________________________________________


_________________________________________________

या कार्यक्रमाचे पाहुण्यांचा परिचय  व प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. विकास कदम यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुबेर गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. एन. एन. तंटक,  विज्ञान विभागाचे अधिष्ठात प्रो. सुरेश पाटील, डॉ. हनुमंत लोंढे, प्रा. डॉ. सुखदेव शिंदे, सिनिअर विभागातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार प्रो. डॉ. सुरेश पाटील यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments