सोलापूर, प्रतिनिधी सोलापूर जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने हमाल मापाडी कामागरांच्या विविध मागण्यांचे निवेदन कामगार आयुक्त तथा माथाडी बोर्डाचे चेअरमन निलेश यलगुंडे यांना देण्यात आले. सोलापूर जिल्हा हमाल माथाडी श्रमजिवी कामगार समन्वय समिती ही महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ पुणे यांच्याशी संलग्न असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व हमाल मापाडी कामगारांसाठी ही संघटना काम करित आहे. या संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या हस्ते व जिल्ह्यातील सर्व हमाल कामगारांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. माथाडी मंडळाकडून सध्या मिळत असलेल्या वैद्यकीय सुविधा व प्रसुतीलाभ तसेच विविध कल्याणकारी योजनेतील लाभ/अनुदान हे मागील 6-7 वर्षापासून मिळत आहे. परंतू दरम्यान या काळात व सद्यस्थितीमध्ये मोठ्या आजारावर व रोगावर शस्त्रक्रिया करणे तसेच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्यानंतर हॉस्पिटलची बिले ऑपरेशन करणे तसेच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्यानंतर हॉस्पिटलची बिले ऑपरेशन चार्जेस, कॉट चार्जेस, नर्सिंग चार्जेस, डॉक्टर व्हिजीट फी, इंजेक्शन, औषध, गोळ्या, सलाईन, एक्सरे, एमआर तसेच मेडिकल स्टोअर्स मधील औषधांच्या किंमतीमध्ये भरमसाठ व मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
त्यामुळे सदरचा खर्च माथाडी हमाल कामगारांना आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे कामगार हा सावकाराच्या विळख्यात अडकला जाण्याची शक्यता आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी चेअरमन यांनी आमच्या खालील मागण्यांचा सहानुभूतीपुर्वक सर्वांगीण विचार करून मागण्या मान्य कराव्यात व हजारो माथाडी कामगारांचे दुवा घ्यावेत असे निवेदन देण्यात आले. नोंदीत माथाडी हमाल कामगार अॅडमिट झाल्यानंतर प्रत्येक आर्थिक वर्षाकरिता सध्या मिळत असलेल्या रू. 15 हजार या रकमेत वाढ करून ती 40 हजार करावी. नोंदीत माथाडी हमाल कामगारांची पत्नी/पती यांना अॅडमिट झाल्यानंतर प्रत्येक आर्थिक वर्षात रू. 10 हजार या रकमेत वाढ करून ती 30 हजार करावी. नोंदीत माथाडी हमाल कामगारांची 18 वर्षाच्या आतील पहिले 2 अपत्य यांना अॅडमिट झाल्यानंतर प्रत्येक आर्थिक वर्षात प्रत्येक रू. 10 हजार या रकमेत वाढ करून ती प्रत्येकी रू. 25 हजार करावी. नोंदीत माथाडी हमाल कामगारांना व त्याच्या कुटूंबियांना मोठ्या शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्यानंतर व खालील शस्त्रक्रिया (ऑपरेशन) झाल्यानंतर त्यांना सध्या देण्यात येणार्या अनुदानामध्ये वाढ होऊन मिळावी.
_________________________________________________
_________________________________________________
नोंदीत माथाडी हमाल कामगारांच्या मुलांना/मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेनुसार सध्या देण्यात येत असलेल्या अनुदानामध्ये वाढ करावी. नोंदीत माथाडी हमाल कामगारांच्या मुला/मुलींना क्रीडा क्षेत्रातील बक्षीस योजनांमध्ये सध्या देण्यात येत असलेल्या अनुदानामध्ये वाढ होऊन मिळावी. वरील प्रमाणे नोंदीत माथाडी हमाल कामगार व त्यांच्या कुटूंबियांना माथाडी मंडळामार्फत सध्या देण्यात येत असलेल्या लाभ व अनुदान देतेवेळेस कामगारांचे एका आर्थिक वर्षामध्ये सध्याचे सरासरी वेतनात वाढ व्हावी. जेणेकरून अधिकाधिक नोंदीत माथाडी कामगारांना त्यांचा त्याच्या वेतनानुसार लाभ होईल असे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी या निवेदनात म्हटले आहे. यावेळी कामगार आयुक्त निलेश यलगुंडे यांनी लवकरच आपल्या मागण्या मान्य केले जातील असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी माथाडी बोर्डाचे निरीक्षक देविदास साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग साबळे, भीमा सीताफळे, दत्ता मुरूमकर, गुरूशांतय्या पुराणिक, सिद्धाराम हिप्परगी, जावेद शेख, हणमंत फुलारी, सतिश सर्वगोड, नागनाथ खंडागळे, शिवानंद पुजारी व संतोष सावंत आदी उपस्थित होते.
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________





0 Comments