निर्भया पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक गजानन गजभारे
पंढरपूर- सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे स्वेरीच्या ग्राऊंडवर दि. २६ व दि. २७ ऑगष्ट २०१९ रोजी पंढरपूर पंचक्रोशीतील सर्व महाविद्यालयामधील १८ वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी पोलीस विद्यार्थी मैत्री-संबंध व पोलिसांविषयी असणारी भीती कमी व्हावी होवून मैत्री वाढावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती निर्भया पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक गजानन गजभारे यांनी दिली.
समाजातील शांतता अबाधित राहण्यासाठी पोलीस आणि नागरिक यांच्यातील संबंध वाढून मैत्री जपण्यासाठी आपसात सुसंवाद होणे गरजेचे आहे. यामुळे परिसरातील अडचणी तसेच शिक्षण घेताना येणाऱ्या कॉलेज परिसरातील अडचणी ह्या पोलिसांपर्यंत पोहचविण्याचे धाडस विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे. या उदात्त हेतूने पंढरपूर पोलीस उपविभागातर्फे स्वेरीच्या ग्राऊंडवर येत्या सोमवारी, दि. २६ व मंगळवारी, दि. २७ ऑगष्ट २०१९ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असे दोन दिवस पोलीस आणि विद्यार्थी मैत्री– संबंध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या स्तुत्य कार्यक्रमाचे उदघाटन पंढरपूर पोलीस उपविभागीय अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या हस्ते सोमवारी सकाळी ९ वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे हे उपस्थित राहणार आहेत. यासाठी येत्या सोमवारी व मंगळवारी पंढरपूर पंचक्रोशीतील सर्व महाविद्यालयातील १८ वर्षे खालील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन निर्भया पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गजानन गजभारे (मोबा.क्र. ८३०८८२३९९०) यांनी केले आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments