स्वेरीकडून पूरग्रस्तांसाठी सहायता निधी म्हणून पाच लाख एक हजार रुपयांचा निधी



                    मुख्यमंत्र्यांकडे धनादेश केला सुपूर्द

पंढरपूर- महाराष्ट्र राज्यात पाऊसामुळे आलेल्या महापुरात अनेक कुटुंबियांचे नुकसान झाले. सांगली, कोल्हापूर आणि पुणे राज्यात पाऊसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. 

हे पाहून गोपाळपुर(ता. पंढरपूर)च्या स्वेरीने नेहमीप्रमाणे मदतीचा हात पुढे केला असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या व्यवस्थापन परीषदेचे सदस्य, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ म्हणून पाच लाख एक हजार रुपयांचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला असून मुख्यमंत्र्यांनी स्वेरीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.     

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

राज्यात गेल्या आठवड्यात पडलेल्या अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.

 त्यांचे संसारिक, आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून त्यांना सर्व ठिकाणाहून मदतीचा ओघ येत असतानाच आपल्या शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक कार्याचा देखील ठसा उमटविलेल्या स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी व फार्मसी महाविद्यालयांच्या पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी विभागातील शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कडून एक दिवसाचा पगार पुरग्रस्तांसाठी सहायता निधी म्हणून जमा केला व त्याचा धनादेश पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या व्यवस्थापन विभागाचे सदस्य, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. 

_________________________________________________


_________________________________________________

यावेळी त्यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेविशेष कार्यअधिकारी प्रा. श्रीकांत भारतीय यांचे स्वीय सचिव गणेश शेळके उपस्थित होते. 

स्वेरी ही शैक्षणिक कार्याबरोबरच नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वेळोवेळी सहकार्य करत असते. गेल्याच वर्षी केरळ राज्यामध्ये अतिवृष्टी झाली होती. 

त्यामध्ये लाखो नागरिक बेघर झाले होते. त्यात अतोनात नुकसान झाले होते. हे पाहून केरळमधील बेघर झालेल्या नागरीकांसाठी स्वेरीकडून पाच लाख अकरा हजार रुपयांचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यअधिकारी प्रा. श्रीकांत भारतीय यांच्याकडे सोपविला होता. 

स्वेरीतील राष्ट्रीय सेवा योजनेकडून देखील मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरु आहे.

_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________

 एकूणच ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता-घेता एक दिवस देणाऱ्यांचे हातही घ्यावे.’ 

या विंदा करंदीकरांच्या ओळी ऐकताना आणि वाचताना खूप चांगले वाटते परंतु अलीकडच्या काळात मदतीचा हात पुढे येत असल्याची घटना दुर्मिळ होत चालली आहे. 

असे असतानाच स्वेरीने मदतीचा हात पुढे करून समाजात एक ‘आदर्श शिक्षण संस्था’ म्हणून आपले स्थान आणखी अधोरेखित केले आहे.

_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments