सोलापूर, प्रतिनिधी :-  सोलापूर जिल्हा हमाल मापाडी माथाडी श्रमजिवी कामगार समन्वय समितीच्यावतीने सहाय्यक कामगार आयुक्त तथा सोलापूर जिल्हा माथाडी बोर्डाचे चेअरमन निलेश येलगुंडे यांना जिल्ह्यातील हामाल कामगारांच्या विविध मागण्याचे पत्र जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या हस्ते 6 ऑगस्ट रोजी देण्यात आले होते. 

त्यानुसार जिल्हा माथाडी बोर्डाचे चेअरमन तथा सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी नुकतीच जिल्हा हामाल मापाडी समन्वय समितीची बैठक घेवून कामगारांचे हित डोळ्यासमोर ठेवून कामगारांच्या कुटूंबियांना वैद्यकीय सुविधा व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून झालेल्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करून जिल्ह्यातील हामाल कामगारांना एक प्रकारचे मोठा लाभ झाला असल्याचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी म्हटले आहे. 

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

या झालेल्या बैठकीमध्ये कामगारांच्या वैद्यकीय सुविधांमध्ये 15 हजारावरून 25 हजार तर पत्नीस 10 हजारावरून 20 हजार तर दोन आपत्य असल्यास मुलास 10 हजार तर मुलीस 20 हजार हा लाभ 15 ऑगस्ट 2019 पासून लागू झाला असल्याचे जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी सांगितले. 

त्याच प्रमाणे शस्त्रक्रिया स्वरूपात 10 हजारा पासून 25 हजारा पर्यंत शिष्यवृत्तीय योजनेसाठी 1 हजार ते 15 हजार रूपये पर्यंत व विशेष शैक्षणिक नैपुण्य संपादन करणार्‍या कामगारांच्या मुलांसाठी 50 हजार रूपयांपर्यंत तर क्रीडा क्षेत्रातील बक्षिस योजनेत 2 हजार ते 15 हजार रू. तर विशेष राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय क्रीडा नैपुण्य प्राप्त नोंदीत कामगारांच्या मुलांना 50 हजार रूपये पर्यंत अशी भरीव वाढ यावेळी करण्यात आली. 


_________________________________________________


_________________________________________________

7 वर्षानंतर ही वाढ करण्यात आली असुन हामाल मापाडी कामगारांमधून आनंदाचे वातावरण आहे. 

यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांचा जिल्हा अध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

तर माथाडी बोर्डाचे निरीक्षक देविदास साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग साबळे, गोरख जगताप,जिल्हा सचिव आबाजी शिंदे,  भिमा सिताफळे, सुखदेव चव्हाण, दत्ता मुरूमकर, गुरूशांतय्या पुणाणिक, सिध्दाराम हिप्परगी, श्रीमंत डांगे, जावेद शेख, जयराम कर्चे, हाणमंत फुलारी, सतिश सर्वागोड, नागनाथ खंडागळे, शिवानंद पुजारी, मारूती बंदपट्टे, हरीभाऊ कोळी, ताजोद्दीन शेख आदी उपस्थित होते. 

_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com