चंद्रभागेच्या पैलतीरावरील पुरग्रस्तांना जेवण देवुन ट्रॅक्टरवरुन पुल ओलांडताना पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट व त्यांचे सहकारी हे थोडक्यात बचावले.
नदीकाठावरील झोपडपट्टीत पुराचे पाणी शिरल्यामुळे येथील नागरिकांना 65 एकरमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासुन येथील पुरग्रस्तांना मंदिर समितीचे कार्य. अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आणि माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या पुढाकाराने जेवण पुरवले जात आहे.
काल बुधवारी नदीवरील अहिल्या पुल आणि जुन्या दगडी पुलावरील नवीन पुल दोन्हीपाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद केले होते. तरीही नदीच्या पैलतीरावरील पुरग्रस्तांना जेवण देणे गरजेचे असल्याने माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, अनंत अंकुशराव आणि त्यांच्यासोबतच्या सुमारे दहा कार्यकर्त्यांनी मोठ्या धाडसाने ट्रॅक्टरमधुन नदीपलीकडे जेवणाचे सामान आणि पाण्याच्या टाक्या नेल्या. जाताना जेवणाचे सामान व पाण्याच्या टाक्यांचे वजनामुळे ट्रॅक्टर नदीपलीकडे सुरक्षीत पोहचला पण येताना मात्र ट्रॅक्टरचे वजन कमी झालेले व पुलावरुन वाहणार्या पाण्याचा प्रवाहही वाढलेला होता. वेगाने वाहणार्या पाण्याच्या प्रवाहामुळे येताना ट्रॅक्टर पुलाखाली कोसळण्याच्या स्थितीत आला. ट्रॅक्टरमधील सर्वांच्या जीवीताला मोठा धोका निर्माण झाला. यावेळी प्रसंगावधान दाखवत दोन कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरचे स्टेअरींग घट्ट ओढुन धरले. आणि चालकाने ट्रॅक्टरचा वेगही वाढलेला ठेवला. त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले व मोठी दुर्घटना होता होता टळली. सर्वजण मरणाच्या दारातुन सुखरुप बाहेर आले. आणि माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर व कार्यकर्ते थोडक्यात बचावले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments