Video News-
कालपासुन चंद्रभागेच्या पात्राने धोक्याची पातळी ओलांडलेली असुन चंद्रभागेचे पात्र दुथडी भरुन वाहु लागले आहे. पंढरीतील अनेक सखल भागात पुराचे पाणी शिरल्यामुळे अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागले. काल चंद्रभागेवरील दगडी पुलाजवळचा नवीन पुल व सरगम चौकानजीकचा नवीन सोलापूर रोडवरील अहिल्यादेवी पुल हे महत्वाचे दोन्ही पुल पाण्याखाली गेल्यामुळे पंढरपूर शहराचा व पुर्वेकडील गावांचा संपर्क तुटला होता. या दोन्ही पुलावरुन वाहतुक बंद झाल्याने नदीच्या दोन्ही तिरांवर अनेकजण अडकुन पडले आहेत. सद्यस्थितीत या पुलावरुन पायी चालत जाणेसाठीची परवानगी प्रशासनाचे वतीने देण्यात आली आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
आज सायंकाळपासुन पुराचे पाणी ओसरु लागले आहे. विसर्गाच्या धोक्याची पातळी मात्र कायम आहे.चंद्रभागेची धोका पाणी पातळी 1 लाख 80 हजार क्युसेक्स आहे. मात्र सध्या चंद्रभागेत 2 लाख 42 हजार इतका विसर्ग आहेे. सध्या प्रशासनाच्या वतीने पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील पुरग्रस्त भागाचे इन कॅमेरा पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यासाठी चार तहसिलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार प्रतिकुटुंब 10 हजारांची मदत पंचनामे झाल्यानंतर लगेच प्रशासनाकडून तातडीने देण्यात येईल. तसेच ग्रामीण भागात केरोसीन व धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. आरोग्यसुविधेची सेवा जिल्हा परिषद व नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून बजावण्यात येत आहे. अशी माहिती आज अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये दिली.
_________________________________________________
_________________________________________________
आज दुपारी 5 वाजल्यानंतर चंद्रभागेवरील दोन पुलावरुन वाहणारे पाणी कमी होऊ लागले आणि हे दोन्ही पुल वाहतुकीसाठी खुले होतील अशी आशा दोन्ही तिरावर अडकुन पडलेल्या प्रवाशांमधुन पल्लवीत होऊ लागली. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने पुलावरची वाहतुक सुरु करणे धोकादायक असल्यामुळे प्रशासकीय अधिकार्यांनी आज हे दोन्ही पुल वाहतुकीसाठी खुले न करण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या दगडी पुलाजवळच्या नवीन पुलावरुन मात्र पायी जाण्यासाठीची परवानगी दिली गेली आहे. अधिकार्यांनी या पुलाची तपासणी करुन हा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी कोणी सेल्फी वगैरे काढु नये किंवा कांही अपघात घडु नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केलेला आहे. चंद्रभागेच्या दोन्ही तीरावर अडकुन पडलेल्या अनेक विद्यार्थी व नागरिकांनी यामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला असुन या पुलावरुन पायी चालत जावुन आपले घर गाठण्यासाठीची अनेकांची लगबग आज दिसुन आली. रात्री उशीरा हलक्या वाहतुकीसाठी दोन्ही पुल खुले होण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पेांताधिकारी सचिन ढोले, तहसिलदार मधुसुदन बर्गे, मुख्याधिकारी अनिकेत महानोर, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे, सार्व. बांधकाम विभागाचे अधिकारी आदींकडून पुलांची पाहणी करण्यात आली असुन जर पुलाच्या पाण्याची पातळी रात्रीतुन खाली गेली तर उद्या म्हणजेच शुक्रवारपासुन हे पुल सर्व वाहतुकीसाठी खुले करण्यात येतील अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments