पंढरपूर: पुरानंतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना




 पंढरपूर, दि. 09 :- वीर व उजनी धरणातून आलेल्या पाण्याचा विसर्गामुळे  नदी काठच्या गावांत व शहरात  पुरस्थिती निर्माण झाली होती. सध्या पुरस्थिती ओसरली आहे. पुरानंतर साथीच्या रोगांचा फैलाव होण्याची शक्यता असते. या साथीच्या रोगांचा फैलाव रोखण्यासाठी  प्रतिबंधात्मक उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याचे मुख्याधिकारी अनिकेत महानोरकर यांनी सांगितले.   

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________
पूरग्रस्त भागांत साथींच्या आजारासह जलजन्य आजारांचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता असते. पूरस्थिती ओसरल्यानंतर साचलेल्या पाण्यात डासांची निर्मिती होऊ नये तसेच साथरोगाचा फैलाव होऊ नये यासाठी शहरातील अंबाबाई पटांगण, व्यासनारायण झोपडपट्टी परिसर, लखुबाई मंदीर परिसर, आंबेडकर नगर आदी ठिकाणी  आरोग्य विभागामार्फत धूर आणि किटकनाशक औषध फवारणी करण्यात येत आहे. तसेच पुरामुळे चिखल साठलेल्या ठिकाणी आग्निशामक वाहनाच्या सहाय्याने पाणी फवारणी करुन तो परिसर स्वच्छ करण्यात आला असल्याची माहितीही मुख्याधिकारी महानोरकर यांनी दिली.

_________________________________________________


_________________________________________________

पंढरपूर तालुक्यातील नदी काठच्या 38 गावांत साथीच्या रोगांचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून आरोग्य पथके कार्यरत ठेवण्यात आली असल्याचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी सांगितले. पूरस्थितीदरम्यान साथीच्या आजारासह जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यात,मलेरिया, डेंग्यु, कावीळ, अतिसार तसेच लेप्टोस्पायरोसिस यासारखे आजार होण्याची शक्यता असते यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत धूर आणि किटकनाशक औषध फवारणी करण्यात येत असल्याचे गटविकास अधिकारी घोडके यांनी सांगितले. तसेच पुराचे पाणी शिरलेल्या राहत्या ठिकाणी स्वच्छ व कोरडे झाल्यावरच  नागरीकरांनी स्थलांतर करावे असे आवाहनही श्री. घोडके यांनी केले आहे.

_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments