पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल पाॅवर व अपारंपारीक उर्जा स्ञोत या क्षेत्रातील माहिती व्हावी यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्देर (नाॅर्वे) विद्यापीठातील डाॅ. मोहन कोल्हे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या मार्गदर्शन शिबिराचे उदघाटन डाॅ. मोहन कोल्हे, ॲकॅडमीक डिन डाॅ. रविंद्र व्यवहारे, डाॅ. श्याम कुलकर्णी, डाॅ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा. अतुल सागडे आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
सिंहगड महाविद्यालयाच्यावतीने डॉ. मोहन कोल्हे यांचा पुष्पगुच्छ डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी सन्मान केला. डॉ. मोहन कोल्हे यांनी स्मार्ट ग्रीड या क्षेत्रांमधील प्राध्यापक ही पदवी नार्वेच्या सायन्स व टेक्नॉलॉजी विभागाने प्रदान केली आहे. मागील वीस वर्षापासून डॉ. मोहन कोल्हे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर अपारंपरिक क्षेत्रामध्ये काम करतात. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, युनिव्हर्सिटी कॉलेज फिनलॅण्ड, युनिव्हर्सिटी कॉलेज दुन्डी अशा विविध ठिकाणी विविध पदावर काम केलेल्या डॉ. मोहन कोल्हे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध संस्थांकडून संशोधन निधी मिळवला आहे.
यावेळी मार्गदर्शन विद्यार्थी व प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना डाॅ. मोहन कोल्हे यांनी संशोधन क्षेञात भरीव कामगिरी करणं अपेक्षित आहे. संशोधन करीत असताना विद्यार्थ्यांनी त्या संशोधनाची माहिती अगोदर घेणे खुप महत्वाची असते. असे मत त्यांनी व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचालन डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी मानले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________








0 Comments