स्वेरीत तंत्रकार्यशाळेचे उदघाटन
पंढरपूर- ‘अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळा नियमित व्हाव्यात व विद्यार्थी स्पर्धेच्या युगात देखील अधिक चांगल्या प्रकारे तंत्रशिक्षण मिळवून भविष्य उज्वल करावे. या हेतूने आमची संस्था विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी उत्तम प्रशिक्षण देत आहे.’ असे प्रतिपादन औरंगाबादच्या इंडो जर्मन टूल रूमचे एम.एस. एम. ई. टेक्नोलॉजी सेंटरच्या ट्रेनींग सेंटरचे इंजिनिअर आर्णव भट्टाचार्यजी यांनी केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
स्वेरी संचलित अभियांत्रिकी व फार्मसीच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवी महाविद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागातर्फे दि ५ ऑगष्ट पासून ते दि ८ सप्टेंबरपर्यंत दरम्यान जवळपास महिनाभर प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाच्या उदघाटन प्रसंगी इंजिनिअर आर्णव भट्टाचार्यजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे होते. प्रारंभी ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ यांनी या प्रशिक्षणासंबंधी व आयोजनासंबंधी सविस्तर माहिती दिली. या प्रशिक्षणात इंटरनेट ऑफ थिंग्ज युजींग ऑर्डीनो, इंडस्ट्रीयल रिव्याल्युशन ४.०, प्रोडक्ट डिझाईन युजींग थ्रीडी प्रिंटर, सिव्हील सर्व्हेयींग युजींग टोटल स्टेशन, या मुख्य चार विषयावर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
_________________________________________________
_________________________________________________
अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी प्रशिक्षणाचे महत्व सांगून भविष्यात नोकरी मिळण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सक्षमता असावी. यासाठी अशा प्रशिक्षणाची वेळोवेळी गरज आहे असे सांगितले. तसेच आपण कसा घडलो? याची देखील डॉ. रोंगे यांनी माहिती दिली. यावेळी अभिनाश खंडागळे, देवेंद्र बोडके, स्वरूप नायक, महेश नवले, अजय बामरे, चंद्रकांत सोनवणे यांच्यासह विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, सर्व विभागप्रमुख, समन्वयक डॉ निखील कारंडे, प्रा. डी. ए. कुंभार, प्राध्यापक वर्ग, यांच्यासह अभियांत्रिकी व फार्मसीचे जवळपास ५०० विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी प्रशिक्षण उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________





0 Comments