महाराष्ट्र प्रदेश युवक इंटकच्या राज्य अध्यक्ष पदी दत्तात्रय गुट्टे तर राज्य सचिव पदी बळीराम गित्ते यांची निवड



                                  इंटकसंघटनेचे कार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करणार-दतात्रय गुट्टे 

   परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य मजदूर काँग्रेस इंटक संघटनेची २०१९ ते २०२२ ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्षपदी दत्तात्र्य गुट्टे यांची फेर निवड करण्यात आली. त्यात बळीराम गित्ते यांची इंटकच्या प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली . या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

    याबाबत सविस्तर वृत्त कि महाराष्ट्र राज्य वीज मजदूर काँग्रेस इंटक या संघटनेचे काम राज्यात व देशभरात खूप मोठ्या प्रमाणात आहे ,वीज कामगारांच्या प्रश्नासाठी लढा देऊन न्याय मिळउन देणारी संघटना म्हणून या संघटनेकडे पहिले जाते. ही निवड राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकचे दिल्ली अध्यक्ष डॉ.संजीव रेड्डी, इंटकचे अध्यक्ष तथा माजी आ.जयप्रकाशजी छाजेड, राष्ट्रीय मजदूर युवक काँग्रेस इंटक दिल्लीचे अध्यक्ष संजय गाभा यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय गुट्टे यांची प्रदेश युवक अध्यक्षपदी तर बळीराम गित्ते यांची इंटकच्या प्रदेश सचिवपदी  निवड करून नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.     

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________


वीज कामगारांच्या व इंटकचे कार्य वाढविण्यासाठी पदाचा वापर करणार –बळीराम गित्ते 

   इंटक संघटनावाढीसाठी व मजबुतीसाठी अथक परिश्रम  घेऊन इंटकचे व वीज कामगारांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी संघटनेचे विचार पोहोचून इंटक वाढीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी त्यांच्यावर नियुक्ती झाल्यानंतर देण्यात आली. त्यातच संघटनेसाठी झोकून देणारे इंटकचे कार्याध्यक्ष दत्तात्र्य गुट्टे यांच्या या अगोदर त्यांनी इंटकचे काम चांगल्यारित्या केल्यामुळे व  संघटनेचे काम तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी काम केले आहे.
   
   त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच गुट्टे या, नेत्यांच्या कार्यामुळे प्रभावी होऊन काम करणारे संघटनेचे सक्रीय कार्यकर्ते बळीराम गित्ते यांची संघटनेचे युवक अध्यक्ष दत्तात्र्य गुट्टे यांनी निवडीचे पत्र देऊन निवड केली ,यावेळी बोलताना बळीराम गित्ते म्हणाले कि संघटनेने प्रदेश सचिव पदी निवड केल्या बद्द्ल मी ऋणी असून येणाऱ्या काळामध्ये या पदाचा वापर राज्यातील वीज कामगारांच्या हक्कासाठी करणार आहे .दरम्यान या निवडी बद्दल दत्तात्र्य गुट्टे व बळीराम गित्ते यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.  दत्तात्रय गुट्टे म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस (इंटक) या संघटनेचे कार्य वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. 

_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments