पंढरपूर (प्रतिनिधी):- चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठावरील व्यासनारायण झोपडपट्टीत पाणी शिरले आहे. पुराच्या धोक्यामुळे येथील 20 कुटंबांचे राम बागेत स्थलांतर करण्यात आले. या सर्व स्थलांतरीत कुटुंबाची नाष्ट्याची व जेवणाची सोय पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट व नगरसेवक विक्रम शिरसट यांचेकडून करण्यात आली आहे.
मागील महिन्यातच येथील कुटुंबांचे पुरामुळे स्थलांतर करण्यात आले होते; परंतु 350 पुरबाधीत कुटुंबापैकी 200 कुटुंबांना शासकीय मदतच मिळाली नसल्याने आज यातील ज्यांच्या घरात पाणी शिरले त्या कुटुंबातील नागरिक स्थलांतर करण्यास तयार नव्हते. परंतु लक्ष्मणराव शिरसट व नगरसेवक विक्रम शिरसट, भारत माने आदींनी या नागरिकांना विश्वासात घेवुन शासकीय मदत मिळवुन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदर नागरिक स्थलांतरीत होण्यास तयार झाले. अशी माहिती नगरसेवक विक्रम शिरसट यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
व्यासनारायण झोपडपट्टी व अंबिका नगर झोपडपट्टीतील रहिवाशांना पुरापासून वारंवार त्रास होऊ नये म्हणून पूर रेषा आखून पूररेषेच्या आत मध्ये शासनाने आहे त्या ठिकाणी घरे बांधून द्यावीत. व मागील महिन्यात आलेल्या पुरामधील पुरबाधीत नागरिकांना व आत्ता पुन्हा स्थलांतरीत झालेल्या पुरबाधीत नागरिकांनाही तातडीने शासकीय मदत मिळावी. अशी मागणी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केली आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments