खर्डी प्रतिनिधी:
पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील काळा खोरा या भागात रामचंद्र आगवणे यांच्या शेतामध्यील शेततळ्यातील पाणी कमी झाल्यामुळे तळ्यातील कागद लिकिज काढण्यासाठी रामचंद्र आगवणे यांचा मुलगा अभिजीत रामचंद्र आगवणे वय 17 व राजस्थान मधील कामगार सुरेंद्रसिंह वय 25 हे दोघे काल सायंकाळी चारच्या सुमारास दोरीच्या साह्याने शेततळ्यामध्ये उतरले. रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे प्लास्टिक कागदावरून सुरेंद्रसिंह याचा पाय घसरला आणि तो तळ्यामध्ये पडला. शेजारीच उभा असलेल्या अभिजीतने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु दोघेही पाण्यामध्ये पडले. हे सर्व दृश्य अभिजीतच्या आईच्या डोळ्यासमोर घडत होते, "आईम वाचव... आई मला वाचव!" अशी आर्त हाक अभिजीत मारत होता. भयभीत झालेल्या आईने अखेर स्वतःचा पदर अभिजीतच्या दिशेने फेकला. परंतु तोपर्यंत दोघेही बुडाले होते.
ही बातमी हा हा म्हणता खर्डी गावांमध्ये पसरली आणि त्या ठिकाणी गर्दी जमू लागली. तळ्यामधील पाणी गढूळ झाल्यामुळे दोघांचा शोध घेणे अवघड झाले होते. अखेर बोरीच्या फांद्यां तळ्यात फिरवल्या आणि अखेर सायंकाळी सातच्या सुमारास दोघांनाही बाहेर काढण्यात आले.
अभिजीतच्या जाण्याने तो शिकत असलेल्या सिताराम महाराज विद्यालय खर्डी या प्रशालेला सुट्टी जाहीर करण्यात आलीय. या घटनेची नोंद पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.
या हृदयद्रावक घटनेमुळे खर्डी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करत आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments