पंढरपूर 16 :- पंढरपूर तालुक्यातील मौजे अनवली येथे आमदार प्रशांत परिचारक यांचेहस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन रविवार दि.15/09/2019 रोजी करण्यात आले. यामध्ये अनवली ते मुंढेवाडी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी र क्कम रू.4.00 कोटीचा निधी मिळाली, अनवली ते रांझणी या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी रू.4.00 कोटीचा निधी मिळाला, अनवली ते सिध्देश्वर वस्ती या रस्त्याच्या खडीकरण व मुरमीकरणसाठी रू.12.00 लाख निधी मिळाला, मातंग समाज मंदिर बांधकामासाठी रू.7.00 लाख निधी मिळाला व सिध्देश्वर मंदिर परिसर काँक्रीटीकरण्यासाठी रू.5.00 लाख निधी मिळाला आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य वसंतनाना देशमुख, पंचायत समिती सभापती राजेंद्र पाटील, उपसभापती अरूण घोलप, पंचायत समिती सदस्य प्रशांत देशमुख, पंचायत समिती सदस्या राजश्री भोसले, माजी उपसभापती दाजी पाटील, पां.का.संचालक हरीषदादा गायकवाड, पंचायत समिती सदस्य नवनाथ बंगाळे, पां.का.संचालक नागनाथ शिंदे, दिलीप गुरव, भुजंगदादा यादव, दत्तात्रय ताड, माजी सरपंच सिताराम शिंदे, औदुंबर डिसले, मनसुर शेख, भजनदास डिसले, बबन पाटील, उपसरपंच महादेव सुर्यवंशी, सोसायटी चेअरमन कोंडीबा माळी, रावसाहेब घोडके, प्रकाश भोसले, उत्तम घोडके, दत्तात्रय सुर्यवंशी व गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना औदुंबर डिसले यांनी केली तर आभार मनसुर शेख यांनी मानले. अनवली येथील विविध विकास कामांना स्थानिक ग्रामस्थांकडून आमदार प्रशांत परिचारक यांचेकडे निधी मिळणेची मागणी केलेली होती. त्याअनुषंगाने आमदार प्रशांत परिचारक यांनी वरील कामांना रू.8 कोटी 24 लाख इतका निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________





0 Comments