मातंग समाजाच्या उत्थान आणि विकासासाठी शासनाचे सर्वतोपरी योगदान - वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार


   पुणेदि. 31 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या विचार व साहित्यातून वंचितांचा आवाज मांडला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मातंग समाजाच्या उत्थान आणि विकासासाठी शासन सर्वतोपरी योगदान देईल. पुणे येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने उदयान उभारण्यात येणार  असल्याचे वित्त्‍व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले.

  महाराष्ट्र राज्य मातंग समाज संघटनेच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले भवनवानवडी येथे करण्यात आले होते. त्यावेळी मुनगंटीवार बोलत होते. यावेळी माजी मंत्री दिलीप कांबळे, नगरसेवक सुनिल कांबळे, जेष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर, भीमराव पाटोळे, राजेंद्र कोंडरे आदी उपस्थित होते.    

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

 मुनगंटीवार म्हणालेअण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचे विचारसाहित्य समाजातील शेवटच्या घटकांपर्यत पोहोचावे यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. अण्णा भाऊंच्या विचाराचे समाजातील प्रत्येकाने अनुकरण करणे आवश्यक आहे. आज समाजातील उत्तम कार्य करणारांचा गौरव करण्याची संधी मिळाली याचा आनंद मोठा आहे. गौरव झालेल्या व्यक्तींना नक्कीच शक्ती मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी कायम श्रमिकांचा सन्मान केला आहे.

 त्यांचे विचार प्रत्येकाला चैतन्य, नवचैतन्य देतात, जन्मशताब्दी वर्षात 100 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला असून मातंग समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगून पुणे येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने उदयान उभे करण्यात येणार आहे. अण्‍णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. वंचितांसाठी लढणाऱ्या अण्णांचे टपाल तिकीट केंद्र सरकारने केवळ आठच दिवसात मंजूर केले. वंचितांच्या विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्नशिल राहणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले. 

_________________________________________________


_________________________________________________

  माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी अण्णा भाऊंच्या नावाने पुरस्कार देवून गत दहा वर्षापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींचा गौरव करण्यात येत असल्याचे सांगितले.

  यावेळी मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर, भीमराव पाटोळे, राजेंद्र कोंडरे यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देत गौरव करण्यात आला. यावेळी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. 

_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments