
पंढरपूर- ‘आयुष्य कसे जगायचे? हे आयुर्वेदाने पूर्ण जगाला शिकवले असले तरी देखील जग आता सुपरफाष्ट होत असून वेगळ्या वळणावर जात आहे. त्यामुळे मनुष्य हा अनेक व्याधींना आमंत्रित करून आपल्या आरोग्याची आपणच हेळसांड करत आहोत. जर आपले मन, इंद्रिय प्रसन्न असतील तर आरोग्य उत्तम आहे असे समजावे. आज धकाधकीच्या जीवनात वेळेवर आहार घेत नसल्यामुळे त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होवून वयोमर्यादा कमी होत आहे. आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामामुळेच मनुष्य आज आजारी पडत आहे. त्यासाठी हिरव्या पाल्याभाजी, कडधान्य खा आणि निरोगी रहा. तसेच नियमित व्यायाम करा.’ असा मूलमंत्र वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी दिला.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटसंचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कॉलेज ऑफ फार्मसीच्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर पदवीच्या शिक्षकाना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या हेतूने ‘लाईफ स्टाईल डीसॉर्डस’ अर्थात ‘जीवन जगण्याच्या चुकीच्या सवयी’ या विषयवार एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
यावेळी माधवबागचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील हे ‘आरोग्यासंबंधी घ्यावयाची काळजी’ या विषयावर उपस्थिताना बहुमोल मार्गदर्शन करत होते. प्रारंभी एमबीएच्या प्रा. एम.एम. भोरे यांनी या आरोग्यासंबंधीच्या कार्यशाळेची आवश्यकता का आहे? हे स्पष्ठ केले. पुढे बोलताना डॉ. पाटील यांनी ‘डायबेटीस, ब्लड प्रेशर, शुगर हे आजार होऊ नयेत यासाठी कामात कोणताही स्ट्रेस न घेता नियमितच्या कार्यपद्धतीत कसा बदल करावा? हे पटवून सांगितले. वजन वाढणे, सांधेदुखी हे का होतात हे सांगून यावर त्यांनी उपाय व घ्यावयाची काळजी सांगितली. तसेच काम लगबगीने उरकण्यासाठी कामाचा वेग वाढवितो यासाठी हृदयाची कार्यक्षमता वाढविताना घ्यावयाची काळजी याबाबत सांगितले.
यावेळी डॉ. पाटील यांच्या समवेत डॉ. दत्तात्रय होनमाने, डॉ. रमेश सुतार, डॉ. अमरसिंह जमदाडे, डॉ भालचंद्र लाड, डॉ. सुषमा लाड, डॉ. अश्विनी जाधव, विशाल साळवी तसेच स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी अंतर्गत इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आरोग्यासंबंधी प्रश्न विचारले यावर डॉ. पाटील यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________








0 Comments