प्रतिकात्मक छाया
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर शहरातील उपनगरांमधील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे उपनगरातील नागरिक भयभीत झाले असून नुकत्याच येथील वांगीकर नगरमधील दिवसाढवळ्या घडलेल्या घरफोडीच्या घटनेमुळे तर भरदिवसा सुध्दा घरात कोणी घुसते की काय? अशी धास्ती नागरिकांना लागलेली असते. टाकळी रोड, लिंक रोड, नागालॅन्ड हॉटेल परिसर, कोर्टी रोड आदी परिसरात चोरीच्या घटनेत वाढ झालेली आहे.
दि.28 रोजी वांगीकर नगर येथील दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीबाबत
बुधवार दि.28 रोजी सकाळी 10 ते सांय 5च्या दरम्यान शहरातील नागालँड हॉटेलच्या परिसरातील जुने वांगीकर नगर येथील शिक्षक चंद्रकांत पिटले यांच्या घरी कोणी नसल्याची संधी साधुन अज्ञात चोरट्यांनी दिवसा ढवळ्या घरफोडी केली. या घटनेत सोने,चांदीच्या दागिण्यासह रोख रक्कम असे मिळुन 57 हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाली.
शहरातील नागालँड हॉटेलच्या परिसरातील जुने वांगीकर नगर येथील निवास्थानी शिक्षक चंद्रकांत पिटले हे आपली पत्नी व दोन मुलांसह वास्तव्य करतात. नेहमीप्रमाणे पिटले हे सकाळी 9 वाजता भैरवनाथवाडी येथील शाळेवर गेले.तर त्यांची दोन्ही मुले सकाळी 10 वाजता त्यांच्या पत्नीबरोबर यशवंत विद्यालय या शाळेत गेले. तर पत्नी त्यांच्या पुस्तकाच्या दुकानात गेली. शाळेचे कामकाज संपवून शिक्षक चंद्रकांत पिटले हे पुस्तकाच्या दुकानात येवून पत्नी बरोबर थांबले. दरम्यान सायंकाळी 5 वाजता दोन्ही मुले शाळेतून घरी आली. त्यांनी त्यांच्याकडीम चावीने घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला; परंतु दरवाजा आतुन उघडत नसल्याने मोठा मुलगा आदीत्य हा घराच्या पाठीमागे गेला असता त्याला घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. यावेळी त्याने आई आतमध्ये असेल म्हणून आत जावून पाहिले तर घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. मुलानेे लागलीच सदर घतनेची माहिती दिली. तेव्हा पत्नी व शिक्षक पिटले यांनी घरी जावून पाहिले असता कपाटात ठेवलेले सोने 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन, एक ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, दोन ग्रॅमची दोन कर्णफूले (एकूण किंमत25हजार रुपये) तर चांदीचे एक बिस्कीट, 50 ग्रॅम वजनाचे हातातील ब्रासलेट किंमत 5 हजार रुपये, रोख रक्कम 27 हजार रुपये असा एकूण 57 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना घडली.
वरील घटना घडल्यापासुन उपनगरामधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments