पंढरपूर - “मनाच्या बळकटीकरणासाठी सुसंस्कार, बुध्दीच्या बळकटीकरणासाठी वाचन तर मनगटाच्या बळकटीकरणासाठी परिश्रम गरजेचे आहेत. शिक्षणाबरोबर शिस्त अंगिकारणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या सुसंस्कार व श्रमाने कुटुंब, समाज व देशाचे हित जपले पाहिजे. सध्या समाजजीवनात विषमता टोकाची वाढली आहे. आरोग्य, शिक्षण, भूक, रोजगार, संरक्षण अशा विविध समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत. म्हणून विद्यार्थ्यांनी देशहितासाठी स्वत:ला तयार करणे गरजेचे आहे.” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात कला शाखेच्या प्रथम वर्षातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना अभिभाषण देताना प्राचार्य डॉ. अशोक भोईटे बोलत होते. पुढे बोलताना प्राचार्य डॉ. अशोक भोईटे म्हणाले की, “सध्याचे युग अतिशय स्पर्धेचे असून पारंपरिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे.
शिक्षण व तंत्रज्ञानाने स्वत:चे व्यक्तीमत्त्व घडविणे आवश्यक आहे. सद्गुण अंगिकारण्यास वेळ लागत असल्याने विद्यार्थ्यांनी चांगल्या मित्राशी मैत्री करावी. ज्ञानाबरोबर शिस्त व सद्गुण अंगिकारल्यास आपला विकास होतो. आपणास मिळालेला वेळ हा चांगल्या पुस्तकाच्या सहवासात घालविणे गरजेचे आहे. चांगली पुस्तके माणसाचे मन व मेंदूची मशागत करुन चांगले संस्कार देत असतात.”
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला शाखेचे अधिष्ठात प्रा. डॉ. तानाजी लोखंडे यांनी केले. या कार्यक्रमावेळी डॉ. एस. पी. शिंदे, प्रा. डॉ. नितीन सोहनी, हनुमंत खपाले, स्वाती जाधव यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध उपक्रमाची व सुविधांची माहिती दिली.
या कार्यक्रमास कला शाखेतील पदवी विषयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. के. पी. गायकवाड यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ. विकास कदम यांनी मानले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________




0 Comments