पंढरपूर- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’च्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा.दिप्ती अमित तंबोळी यांना नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या श्री. गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिटयुट ऑफ इंजिनिअरिंग, नांदेड या अभियांत्रिकीमधील इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगच्या ‘सम स्टडीज् ऑन मल्टीपल मॉडेल बेसड अॅडप्टीव्ह कंट्रोल स्ट्रॅटीजीज फॉर कॉम्प्लेक्स सिस्टम्स’ या विषयात पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी आपला शोध निबंध नांदेड विद्यापीठामध्ये सादर केला होता. त्यांच्या यशाबद्धल सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉ. आर. एच.चिले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या प्रेरणेने प्रा. दिप्ती तंबोळी यांनी पीएच.डी. पूर्ण केली. त्यांना कुटुंबियातील सर्व सद्स्यांबरोबरच स्वेरीतील इतर प्राध्यापकांचे बहुमोल सहकार्य लाभल्याचे डॉ.दिप्ती तंबोळी यांनी सांगितले. पीएच.डी. प्राप्त केल्यामुळे शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्वेरीतर्फे डॉ. तंबोळी यांचा डॉ. भुवनेश्वरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. दिप्ती तंबोळी ह्या स्वेरी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात मागील तेरा वर्षापासून ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’ विभागात उत्कृष्टपणे ज्ञानदान करत असून सध्या डॉ. तंबोळी ह्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागाच्या विभागप्रमुख आहेत.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
त्यांनी आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये संशोधन पेपर सादर केले तसेच ‘स्प्रिंगर’ या आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून शोध प्रबंध प्रकाशित केले असून जयपूर (राजस्थान) याठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत देखील त्यांनी सहभाग घेऊन आय. ट्रिपल इ मध्ये देखील शोध पेपर सादर केला आहे. यावेळी अॅटलास कोपको इंडिया लिमिटेडचे कार्पोरेट मानव संसाधन व्यवस्थापक कबीर गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा यांच्यासह स्वेरीचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, संस्थेंअंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉ. दिप्ती तंबोळी यांचे अभिनंदन केले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________




0 Comments