आढीव : उजनी धरणातून पुन्हा एकदा भीमा नदीत मोठया प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे.गत महिन्यात भीमा नदीस आलेल्या पुरावेळीही उजनी धरणातून जवळपास 65 टि.एम.सी.पाणी वाहून गेले होते.केवळ पुणे व सातारा जिल्ह्यातील पावसामुळे वीर-भाटघर व उजनी धरणातून पाणी सोडल्यामुळे हा पूर आला होता.त्याचवेळी सोलापूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने येथील शेतकर्यांची अगदी पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण सुरु आहे.मात्र अशावेळी भीमा पाटबंधारे विभागाचे अधिकारी मात्र डोळ्यावर झापड ओढून या सार्या प्रकाराकडे कानाडोळा करीत असून कालव्याद्वारे उपफाट्यांना पाणी सोडण्यात यावे अशी मागणी होत असतानाही त्याची दखल घेण्यात आली नाही.
त्यामुळे जनभावना संतप्त झाली असून एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर तर दुसरीकडे भीमा नदी दुथडी भरुन वाहत आहे असे दुदैवी चित्र पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे तालुक्यात दिसत आहे.या गंभीर प्रकाराची दखल घेवून उजनी वितरीकेच्या फाटा क्रमांक 38 व 39 ला उजनी डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे अशी मागणी तुंगत,ना.चिंचोली,रोपळे, आढीव,बाभुळगाव,ईश्वर वठार आदी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
नुकतेच उजनी डाव्या कालव्यावरील या दोन्ही उपफाट्यांना पाणी सोडण्यात आले होते मात्र ते तीनच दिवसात बंद करण्यात आले.हा प्रकार घडल्यानंतर या फाट्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्यांनी संपर्क साधून तक्रार केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याची चर्चा होताना दिसून आली.त्यामुळे भागातील शेतकरी व ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेवून तातडीने या उपफाट्यास पाणी न सोडल्यास उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे.
प्रताप वाघ (आढीव)
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________





0 Comments