पंढरपूर- भविष्यात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे खूप महत्त्व असून स्वेरीतील विद्यार्थी डॉ.रोगे सरांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली यशस्वी होत असतात. हा एक इतिहास आहे, स्वेरीची शैक्षणिक क्षेत्रातील ही झेप पाहता प्लेसमेंटमध्ये देखील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील शंभर टक्के विद्यार्थी प्लेस होतील.’ असे भाकीत एम. एस. इ.टी. सी. एल. विभागाचे उपविभागीय अभियंता महादेव सोनटक्के यांनी केले.
स्वेरी संचलित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रिक इंजिनियअरिंगच्या वतीने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन (इसा)ची स्थापना करण्यात आली. यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून अभियंता सोनटक्के विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवी पुरोहित होते. प्रारंभी इसा’चे समन्वयक प्रा. धनराज डफळे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्तविकात संपूर्ण माहिती दिली. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे म्हणाले की, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर काठीओर परिश्रमाची गरज आहे.’ असे सांगून त्यांनी खडतर वाटचालीतील अनुभव सांगितले. विभागप्रमुख डॉ दीप्ती तंबोळी म्हणाल्या की, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली इसा’चे हे पहिलेच वर्ष असून इलेक्ट्रीकल क्षेत्रात विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या गुणवत्तेत वाढ करणे, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी हा इंजिनिअरिंग उत्तीर्ण झाल्यानंतर समाजात वावरताना स्वतःचे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळख निर्माण करेल. इसा’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निर्णयक्षमता, ज्ञान आणि कौशल्य वाढण्यास मदत मिळणार आहे.’
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
अध्यक्षस्थानावरून बोलताना रवी पुरोहित म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जर कोणत्याही क्षेत्रात दहा हजार तासापेक्षा अधिक तास जर अभ्यास केला तर माझ्या माहितीनुसार तो विद्यार्थी त्या क्षेत्रातील विद्वान असेल.’ इसाच्या उदघाटनाच्या निमित्ताने इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग विभाग पूर्णपणे सजला होता. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सादरीकरण केले.
जुन्या काळातील उपकरणांपेक्षा विजेच्या उपकरणांमुळे आपले जीवन कसे आरामदायक बनले आहे याबद्दल विद्यार्थ्यांनी विविध प्रकारे पोस्टर सादरीकरण केले. याचवेळी इसा’च्या वतीने झालेल्या लोगो’ स्पर्धेचे बक्षीस वितरण देखील करण्यात आले. अभियंता सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना पॉवर सिस्टम या विषयावर सविस्तर माहिती दिली. हे पाहण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील विविध शाळा मधील विद्यार्थी, स्वेरीचे विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन साक्षी काळे व किशोरी सावंत यांनी केले तर गायत्री एकतपुरे यांनी आभार यांनी मानले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
0 Comments