पंढरपूर 17:- शिरगांव गावामध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार प्रशांत परिचारक म्हणाले की, शिरगावाच्या सर्वांगीन विकासासाठी मी कटीबध्द आहे. यावेळेस शिरगांव ते ढवळस हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून रखडला होता. तेथील स्थानिकांनी आमदार प्रशांत परिचारक यांचेकडे या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करणेची मागणी केली होती. त्याअनुषंगाने आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री यांचेकडे या रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध करणेसाठी लेखीपत्राद्बारे मागणी केली होती. या कामास मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्यासाठी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रयत्नातून रू.1 कोटी 18 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच दलित वस्ती येथे समाज मंदिरासाठी रू.5.00 लाख निधी मंजूर करण्यात आला असल्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
या कामाच्या उदघाटनास जि.प.सदस्य वसंतनाना देशमुख, पंचायत समिती सदस्य प्रशांत देशमुख, राजश्रीताई भोसले, सोसायटीचे चेअरमन संदीपान वाडेकर, ज्ञानेश्वर वाडेकर, चेअरमन सतीश घाडगे, तंटामुेीचे अध्यक्ष दादासो घाडगे, ज्येष्ठ नेते रमेश घाडगे, रावसाहेब घाडगे, शंकर घाडगे, कुमार घाडगे, आबसो देशमुख, गुरूनाथ माने, गणेश वाडेकर, गणेश घाडगे, सुरज घाडगे, मुकेश घाडगे, संगाम वाडेकर, औदुंबर वाडेकर, अमित घाडगे, लखन वाडेकर, प्रथमेश वाडेकर, दत्ता घाडगे, प्रशांत घाडगे, राहुल घाडगे, विशाल घाडगे, राजु वाडेकर, समाधान गायकवाड, सिध्देश्वर माने, दत्ता ताड, ताड गुरूजी, किसन भुताडे, गणेश घोडके, नागनाथ शिंदे, रणजित जाधव, अनिल कुरे, गणेश पंडीत, नवनाथ वाडेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक नेते दादासो घाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य विक्रम वाडेकर यांनी केले. शिरगांव येथील विविध विकास कामांना स्थानिक ग्रामस्थांकडून आमदार प्रशांत परिचारक यांचेकडे निधी मिळणेची मागणी केलेली होती. त्याअनुषंगाने आमदार प्रशांत परिचारक यांनी वरील कामांना निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________





0 Comments