पंढरपूर - रोहिणी नक्षत्रापासून आजपर्यंत सर्व नक्षत्र कोरडी गेल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगाम वाया गेलेला आहे. एकीकडे सोलापूर जिल्ह्यात पावसाचा थेंब ही नसताना भिमा नदीला वारंवार महापुर येत असल्यामुळे नदी तिरावरील शेतकरी व ग्रामस्थांना त्याचा फार मोठा फटका बसत असून यामुळे शेतकरी दुहेरी कात्रित सापडला आहे. तर आजपावेतो पावसाचा थेंबही नसल्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी ही शेतकऱ्याला करता येत नाही. सध्या निवडणूकीचे वारे वाहत असल्यामुळे प्रशासन व राजकीय नेत्यांनी शेतकरी वर्गाला वाऱ्यावर सोडल्यासारखी अवस्था निर्माण झालेली आहे.
त्यामुळे सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश सचिव प्रा.अशोक डोळ यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदरचे निवेदन पाटील यांनी स्विकारले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
यावेळी सोलापूर जिल्हा कॉंगे्रस ओबीसीचे उपाध्यक्ष मिलिंद अढवळकर, अक्षय अढवळकर उपस्थित होते. या निवेदनात असे म्हटले आहे की, सद्यस्थितीत गुराला चारा नाही, अनेक ठिकाणी वाडी वस्तीला प्यायला पाणी नाही. अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभा करण्यासाठी शासनाने संपूर्ण सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा व त्यांना दिलासा देण्यासाठी संबंधित उपाययोजना ताबडतोब कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________





0 Comments