पंढरपूर- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा.मिथुन गोपीकिशन मणियार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून फार्मसीमधील ‘फार्मासुटीक्स’ विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. ‘फॉर्म्युलेशन अँन्ड इव्हॅलेशन ऑफ व्हेसिक्युलार ड्रग डिलिव्हरी सिस्टम्स ऑफ वॉटर इनसॉल्युबल ड्रग्ज’ या विषयावर त्यांनी आपला शोधप्रबंध पुणे विद्यापीठास सादर केला होता. त्यांना मिळालेल्या यशाबद्ल सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉ. चंद्रकांत कोकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या प्रेरणेने प्रा.मिथुन मणियार यांनी पीएच.डी. पूर्ण केली असून त्यांना बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल तसेच फार्मसीच्या इतर प्राध्यापकांचेही सहकार्य लाभल्याचे डॉ. मणियार यांनी आवर्जून सांगितले. पीएच.डी. प्राप्त केल्याबद्धल स्वेरीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ‘डॉ. मणियार हे स्वेरीच्या फार्मसी महाविद्यालयात गेल्या ११ वर्षापासून उत्कृष्टपणे ज्ञानदान करत आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. डॉ. मणियार यांना ‘अविष्कार’ या विद्यापीठ स्तरीय शोध पेपर सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले होते. खराडी,पुणे, गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली व कॉलेज ऑफ फार्मसी आलमला, लातूर या ठिकाणी डॉ. मणियार यांनी आपले शोध पेपर सादरीकरण केले. सत्कार प्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे, अॅटलास कोपको इंडिया लिमिटेडचे कार्पोरेट मानव संसाधन व्यवस्थापक कबीर गायकवाड, प्रा.संकेत पवार, प्रा.गणेश धांडोरे, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थापक जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, हे देखील उपस्थित होते. पीएच.डी. प्राप्त केल्यामुळे डॉ. मणियार यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा यांच्यासह इतर पदाधिकारी व विश्वस्त तसेच संस्थेंअंतर्गत असणाऱ्या चारही महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________




0 Comments