सोलापूर विद्यापीठाच्या ‘सृजनरंग’ नियतकालिक स्पर्धेत पंढरपूर सिंहगड अव्वल
पंढरपूर: (प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सृजनरंग’ नियतकालिक स्पर्धा २०१८-१९ मध्ये कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाने विविध स्पर्धेत एकूण २० बक्षीस प्राप्त करून नियतकालिक स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद मिळाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी पत्रकारांना दिली.
‘अव्दिक’ नियतकालिक मध्ये सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मुलाखीती प्रकाशित केल्या होत्या. या मुलाखतीला ‘सृजनरंग’ नियतकालिक स्पर्धा २०१८-१९ मध्ये प्रथम क्रमांक मिळाले असून याच बरोबर मराठी-हिंदी ललित लेखन, व्यंगचित्र, विनोदी लेख, प्रवासवर्णन, वैचारिक, वैज्ञानिक या साहित्याला ही प्रथम क्रमांक मिळाले आहेत.
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी ‘अव्दिक’ या नियतकालिकचा अंक अतिशय वाचनीय, सर्वाग-सुंदर बनविण्याचा प्रयत्न केला असून विद्यार्थ्यांना लिहते केले, शिवाय त्यांच्या अक्षर शिल्पांना न्याय देण्याचे काम महाविद्यालयाने केले आहे. यामध्ये सामाजिक प्रश्न, थोर महापुरुषांचे विचार, शैक्षणिक लेखन अशा अनेक गोष्टीने सर्वगुणसंपन्न लेखन केले आहे.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने ‘सृजनरंग’ नियतकालिक स्पर्धा २०१८-१९ मधील स्पर्धेत सहभाग घेऊन एकूण २० बक्षीस प्राप्त केल्याने महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बक्षीस मिळालेल्या विद्यार्थ्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, प्रकाशन अधिष्ठाता डॉ. संपत देशमुख आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिंनंदन केले. ‘अव्दिक’ नियतकालिकचा अंक तयार करण्यासाठी महविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________




0 Comments