पंढरपूर (प्रतिनिधी):- दि. 26 सप्टेंबर रोजी चंद्रभागेच्या तीरावरील महाद्वार घाटावर स्नान करत असताना श्रावण हरसुळे (वय 32), रा. धर्मापुरी, ता.जि.परभणी हे भाविक पुराच्या पाण्यात वाहुन गेले आहेत. या भाविकाचा अद्यापही शोध लागला नाही. त्यामुळे हरसुळे यांचे नातेवाईक चिंतेत आहेत. अशा प्रकारचे वृत्त कालच ‘पंढरपूर लाईव्ह’वर प्रसिध्द करण्यात आले होते. प्रशासनाच्या वतीने आज शोधकार्य सुरु झाले आणि अखेर आज चंद्रभागेच्या पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या श्रावण आडसुळे रा. धर्मपुरी परभणी याचा मृतदेह खरसोळी येथे सापडला.
पाण्याच्या वेगवान प्रवाहाच्या वेगामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. परंतु आज या भाविकाचा शोध कोळी बांधव आणि समाजातील अनेक तरूण होडी चालकांच्या मदतीने प्रशासनाकडून लावण्यात आला.
तातडीची मदत म्हणून श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदेलवाड यांनी रोख दहा हजार रुपये नातेवाईकडे सुपूर्त केले.सोबत लेखाधिकारी सुरेश कदम होते. एखादी व्यक्तीचा अशा प्रकारे मृत्यु होतो तेंव्हा त्यांचा विमा म्हणून रुपये दोन लाख रुपयांची आर्थिक मदत मंदिर समितीकडून मृताच्या नातेवाईकास दिली जाते.
अशा प्रकारच्या घटना घडु नये म्हणुन मंदिर समिती व नगरपरिषद प्रशासनाकडून चंद्रभागेच्या तीरावर सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी होत आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments