रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रोच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील ११ आदेश शिक्षकांना विशेष सन्मानपत्र देऊन आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रोच्या अध्यक्षा रागिणी कंदाकुरे, शिक्षणतज्ज्ञ एस.पी. जवळकर, माजी प्राचार्य जीवन देसाई, मनीषा वाघचौरे यांच्यासह आदर्श शिक्षक.
औरंगाबाद (प्रतिनिधी) : शिक्षकांनी एकनिष्ठपणा, समर्पित भावना व पवित्र निर्धारवृत्ती या त्रिसूत्रीनुसार ज्ञानदानाचे कार्य केल्यास भविष्यातील पिढी ही सक्षम घडू शकते. उद्याची सक्षम पिढी घडविण्याची ताकद केवळ शिक्षकामध्ये आहे. हा विचार शिक्षकांनी मनात रुजवून समर्पित भावनेने कार्य करावे, असे आवाहन शिक्षणतज्ज्ञ एस.पी. जवळकर यांनी केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
चितेगावच्या संत एकनाथ विद्यालयामध्ये रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रोच्या वतीने जिल्ह्यातील ११ आदर्श शिक्षकांना 'आदर्श शिक्षक' पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरस्वती भुवन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जीवन देसाई, रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रोच्या अध्यक्ष रागिणी कंदाकुरे, प्रकल्प व साक्षरता समितीच्या संचालक मनीषा वाघचौरे, मोना भूमकर यांची उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना शिक्षणतज्ञ एस.पी जवळकर म्हणाले, 'अभियंता पूल बांधू शकतो, शास्त्रज्ञ रॉकेट तयार करू शकतात, चित्रकार उत्तम चित्र काढू शकतो पण या सर्वांना घडवणारा एक उत्तम शिक्षक असतो. त्यामुळे शिक्षकानी आपले महत्त्व लक्षात घेऊन जबाबदारीने पिढी घडवणे गरजेचे आहे. ही पिढी म्हणजे राष्ट्राची संपत्ती आहे.' कार्यक्रमाच्या अध्यक्ष रागिणी कंदाकुरे यांनी शिक्षकांना सन्मानित करणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे सांगितले. तर माजी प्राचार्य जीवन देसाई यांनी समाजाला शिक्षक दिशा कसे देऊ शकतात, हे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगनाथ लघाने तर आभार प्रदर्शन गणेश वाघचौरे यांनी केले. या कार्यक्रमाला पैठण तालुका ग्रामीण विकास संस्थेचे पदाधिकारी, रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रोचे सर्व पदाधिकारी, औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील आदर्श शिक्षक उपस्थित होते.
________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments