पंढरपूर: राष्ट्रीय मूल्यांकन आणि मूल्यमापन (नॅक) ला सामोरे जाणाऱ्या महाविद्यालयांना नॅक प्रक्रियेविषयी मार्गदर्शन व मदत करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘परामर्श’ ही नवीन योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाने रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाची ‘सल्लागार महाविद्यालय’ म्हणून निवड केली आहे. ‘परामर्श योजनेत’ निवड होणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील हे पहिलेच महाविद्यालय असल्याची माहिती प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांनी दिली आहे.
या योजनेअंतर्गत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी सलंग्नीत नॅकला सामोरे जाणाऱ्या कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा, माणदेश महाविद्यालय, जुनोनी, न्यू सातारा कॉलेज ऑफ बी. सी. ए., पंढरपूर, मदनसिंह मोहिते पाटील विज्ञान महाविद्यालय, मंगळवेढा, विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभूर्णी या महाविद्यालयाची निवड केली असून निवडलेल्या या महाविद्यालयांना वर्षभरात विविध स्तरावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्ष (आय.क्यू.ए.सी.)च्या माध्यमातून या महाविद्यालयांसाठी नॅक प्रक्रियेतील तज्ज्ञ लोकांची व्याख्याने, अध्यापनाच्या आधुनिक पद्धती, अध्यापनासाठी आवश्यक असलेल्या ई–सामग्री तयार करण्याच्या विषयांवर कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. नॅक मूल्यांकनासाठी आवश्यक स्वरुपातील कागदपत्रे तयार करणे व ऑनलाइन पाठविणे आदी घटकांवर ही चर्चासत्रे, परिषदा व कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याशिवाय कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्षातील प्राध्यापक नॅक मूल्यांकन न झालेल्या महाविद्यालयास भेटी देऊन मूल्यांकन प्रक्रियेबाबत जागृत करणार आहेत. या सर्व उपक्रमांसाठी ‘परामर्श’ या योजनेअंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून सल्लागार महाविद्यालयास निधी प्राप्त होणार असल्याचेही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांनी सांगितले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________





0 Comments