पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे भाजपाचे भावी आमदार हे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक हेच असतील. आम्ही सर्व परिचारक समर्थक, नगरसेवक, परिचारक गटातील अनेक कार्यकर्ते उद्या पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवुन सुधाकरपंत परिचारक यांना भाजपाची उमेदवारी देण्याची मागणी करणार आहोत. अशी माहिती नगरसेवक विक्रम शिरसट यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक संस्थांच्या माध्यमातून भाजपाचे जाळे पसरविण्यात परिचारकांचा सिंहाचा वाटा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा व पंढरपूरच्या जागा निवडणार्या परिचारकांचा सिंहाचा वाटा आहे. भाजपकडून सुधाकरपंत परिचारक यांना उमेदवारी मिळाल्यास सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपाची ताकद आणखी वाढणार असून त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते अहोरात्र झटून परिचारक साहेबांना निवडून आणणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुधाकरपंत परिचारक यांचा नक्कीच विचार करतील असा आम्हाला सार्थ विश्वास आहे.
उद्या दि. 22 सप्टेंबर 2019 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची पुण्यात भेट घेणार आहोत. यावेळी त्यांना लेखी निवेदनही देणार आहोत. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार म्हणुन सुधाकरपंत परिचारक यांची उमेदवारी निश्चितच जाहीर होईल आणि ते विक्रमी मताधिक्क्याने निवडुनही येतील याचा आम्हाला सार्थ विश्वास आहे. असे मत नगरसेवक विक्रम शिरसट यांनी व्यक्त केले आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments