स्वेरीमध्ये ‘मेसा’ तर्फे तंत्रज्ञान मॉडेलचे प्रदर्शन संपन्न



स्वेरीत ‘मेसा’ तथा ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन’ तर्फे प्रदर्शनाचे आयोजन केले होते. याचे उदघाटन करताना लोणावळा
 महाविद्यालयाचे प्रा. दत्ता घोडके सोबत एम.बी.ए.चे विभागप्रमुख प्रा. करण पाटील, विद्यार्थी अधिष्ठाता 
डॉ. अभय उत्पात, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. पी.एस. कचरे, समन्वयक प्रा. संजय मोरे.
पंढरपूर- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध तंत्रज्ञानाची आकर्षक अशी मॉडेल्स प्रदर्शन ‘मेसा’ तथा ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन’ कार्यक्रमाद्वारे प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
      लोणावळा महाविद्यालयाचे प्रा. दत्ता घोडके यांच्या हस्ते ‘मेसा’चे उदघाटन झाले. या कार्यक्रमात अवजड वाहनांचे विविध पार्टस, सैन्यातील रणगाडे, क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने व तसेच नुकत्याच झालेल्या चंद्रयान-२ चे ऑर्बीट व लँडर यांच्या अत्याधुनिक मॉडेलचे प्रदर्शन भरवले होते. हे तंत्र मॉडेल्स पाहण्यासाठी तीन दिवस विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या कार्यक्रमास पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी भेट देवून तंत्रज्ञान विषयी माहिती जाणून घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकी विषय आणखी जिज्ञासा निर्माण झाली.विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीमधील विविध शाखेची पायाभूत माहिती दिल्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्याची संधी असल्याचे स्वेरीतील विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. या प्रदर्शनामध्ये संरक्षण विभागात महत्वाची भूमिका बजावणारे विविध रणगाडे व त्यांचे नमुने तसेच वीज निर्माण करणारा हायड्रोलिक पावर प्लांट, भारताचे माजी राष्ट्रपती व दिवंगत शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे सात प्रकारचे मिसाईल्स व त्यांचे विविध नमुने यांचा वापर कुठे कुठे करण्यात आला याची सविस्तर माहिती देणारे पोस्टर प्रदर्शन भरवले होते नवीन तंत्रज्ञानाची माहिती, मोठे मोठे जहाज, लढाऊ विमानं, यांचे मॉडेल्स तयार करून संपूर्ण विभाग मेकॅनिकलमय बनवण्यात आले होते. विविध ठिकाणी रांगोळी, रंगबिरंगी फुले लावण्यात आले होते. या कलाकृतीतुनही मेकॅनिकलचे दर्शन होत होते. यावेळी ‘मेसा’चे विद्यार्थी अध्यक्षा शुभदा म्हेत्रे, इतर सहकारी सिद्धेश्वर खपाले, विकास धुमाळ, रोहित आदलिंगे, प्रतिक इंगळे, अरबाज तांबोळी, मुस्कान आत्तार, मानसी भूमकर, पोर्णिमा निकते, मानसी घोगले, सोनाली चव्हाण, अभिषेक खोटे, एजाज शेख यांच्यासह आदी विद्यार्थ्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या नेतृत्वाखाली मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एस. ए. सोनवणे, प्रशासन अधिष्ठाता डॉ. आर. आर. गिड्डे, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. पी.एस. कचरे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, एम.बी.ए. चे विभागप्रमुख प्रा. करण पाटील व मेसा समन्वयक प्रा. संजय मोरे यांच्यासह इतर सहकार्‍यांच्या व प्राध्यापकांच्या उपस्थित उत्तमरित्या पार पडले.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________

_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments