ऐन सणासुदीच्या काळातच डाळींच्या दरात वाढ होण्याची शक्यता


मुंबई: यंदा मान्सून लांबला आहे. पुढील १५ दिवस पाऊस कायम राहिल्यास डाळींची आवक घटण्याची शक्यता आहे. परिणामी ऐन सणासुदीलाच डाळींची किंमत कडाडण्याची शक्यता व्यापा-यांनी व्यक्त केली आहे. नागपूर, अकोला, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटकमधील हुबळी येथून मुगाच्या डाळीची मुंबईत आवक होते. या सर्व ठिकाणी अद्यापही पाऊस सुरू आहे.

पावसाळा सरल्यानंतर साधारण महिनाभरात नवीन डाळी बाजारात येतात. यंदा सर्वत्रच दमदार पाऊस सुरू आहे. तूर, हरभरा, मूग या उत्पादन पट्टय़ात अद्याप पावसाचा जोर कमी झालेला नाही. याबाबत डाळींचे घाऊक व्यापारी व अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट) सचिव रमणिकभाई छेडा यांनी सांगितले की, मुंबईत प्रामुख्याने विदर्भ व गुजरातमधील काही भागातून डाळींची आवक होते. या दोन्ही ठिकाणी आतापर्यंत अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे.
यामुळे आता ज्या डाळी तयार होत आहेत. त्यात ओलसरपणा आहे. या स्थितीत आता पाऊस थांबला नाही तर, या डाळी खराब होण्याची भीती आहे. डाळींमधील हा ओलसरपणा घालविण्यासाठी किमान आठवडभराचे कडक ऊन आवश्यक असेल. अन्यथा पुढील महिन्यापासून सुरू होणा-या नवीन डाळींची आवक रोडावेल. त्याचवेळी जुन्या डाळींचा साठाही दिवाळीपर्यंत संपेल व त्यातून दरवाढ होऊ शकते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________
तूरडाळ व मुगाच्या डाळीसाठी लागणा-या कच्च्या पिकात आद्र्रता तशीही अधिक असते. डाळ तयार करण्याच्या प्रक्रियेत ती बाहेर काढली जाते. पण अद्याप पाऊस दमदार सुरू असल्याने या डाळींमध्ये आद्र्रता अधिक आहे.
एकदा या डाळींनी आद्र्रता पकडली की लवकर कोरडय़ा होत नाहीत. पाऊस लांबल्यास नोव्हेंबरशिवाय नवीन माल खरेदी करायचाच नाही, असे व्यापा-यांनी ठरवले आहे. तसे झाल्यास डाळींची मागणी अधिक असलेल्या नवरात्र-दिवाळीदरम्यान बाजारात सुमारे २० टक्के आवक रोडावण्याची शक्यता व्यापा-यांनी व्यक्त केली आहे.
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments