मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेवर घेण्याची तसेच राज्याच्या मतदार यादीतील ४४ लाख ६१ हजार बोगस मतदारांची नावे तातडीने वगळण्याची मागणी काँग्रेस पक्षाने देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्याकडे केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राच्या दौ-यावर आलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा तसेच आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांची बुधवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांनी निवडणूक प्रकिया मतपत्रिकेच्या माध्यमातूनच राबविण्याचा आणि मतदार यादीतील बोगस मतदार वगळण्याची मागणी लावून धरली.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
लोकसभा निवडणूक होण्यापूर्वी २५ फेब्रुवारी २०१९ रोजी निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या बैठकीत प्रदेश काँग्रेसने ४४ लाख ६१ हजार बोगस मतदारांची माहिती पुराव्यांसह दिली होती. मात्र अद्याप हे सगळे मतदार वगळले गेले नाहीत, अशी माहिती शर्मा यांनी आयोगाला दिली. त्यावर उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी २ लाख १६ हजार बोगस मतदारांची नावे यादीतून वगळली असून, उर्वरित मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.यासंदर्भात प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना राजेश शर्मा यांनी बोगस मतदारांची नावे वगळण्याबाबत आयोगाकडून दिरंगाई होत असल्याचे सांगितले. मुक्त व निर्भय वातावरणात निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया राबविण्याकरिता बोगस मतदारांची नावे मतदारयादीतून तत्काळ वगळण्याची गरजही त्यांनी विषद केली.मतदान यंत्रांवर जनतेचा विश्वास नसल्याने आगामी विधानसभा निवडणूक मतदान पत्रिकेवर घेण्याची मागणी बहुतांश राजकीय पक्षांनी केली आहे. ही मागणी निवडणूक आयोगाने तत्काळ मान्य करावी, असा आग्रह देखील त्यांनी धरला. निवडणूक आयोगाची भेट घेणा-या काँग्रेसच्या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसच्या विधी विभागाच्या अॅड. गौरी छाब्रिया यांचा समावेश होता.
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
..अन्यथा मतदानांवर परिणाम : राष्ट्रवादीची सूचना
देशाचे मुख्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाला निवेदन सादर करण्यात आले.
निवडणुकीची तारीख निश्चित करताना दिवाळीच्या सुट्टीत लोक गावी जातील आणि त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो. त्यामुळे दिवाळीपूर्वी मतदान पूर्ण करण्याचा विचार करावा, अशी मागणी केली. विधानसभेच्या उमेदवारासाठी निवडणूक खर्च हा २८ लाखांचा असतो तो कमी आहे. महागाई वाढली आहे, जीएसटी आहे. हा खर्च अपुरा आहे. त्यामुळे खर्चाची मर्यादा वाढवली पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, राजकीय कार्यकर्त्यांंवर राजकीय गुन्हा असला तर जाहिरात तीन वेळा वर्तमानपत्रात आणि टीव्हीमध्ये द्यावी लागते. त्याचा खर्च जवळपास ८ लाखाच्या वर जातो. हा खर्च निवडणूक आयोगाने उचलावा किंवा डीजीपीआरच्या दराने माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी आदेश निर्गमित केले पाहिजेत, अशी मागणीही राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आली.
पोलिंग बुथ हे वरच्या मजल्यावर असतात त्यांना खाली ठेवले पाहिजे. वयस्कर व अपंग लोकांना त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर मतदारयादीत शुद्धीकरणात ज्या मतदारांचे फोटो नाहीत ते मतदान करत असताना त्याची काटेकोरपणे खात्री करून घेतली पाहिजे. याशिवाय बॅलेटपेपरवर मतदान घ्यावे असा मुद्दा प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी उपस्थित केला.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments