पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
यावेळी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग, सिव्हिल इंजिनिअरींग, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. चेतन पिसे, अॅकॅडमी डीन डॉ. रविंद्र व्यवहारे, डॉ. शाम कुलकर्णी, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा. नामदेव सावंत, प्रा. सुधा सुरवसे आदी सह विभातील शिक्षकांच्या उपस्थित दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
यावेळी उपस्थित शिक्षकांचे विद्यार्थ्यांनी गुलाब व पेन देऊन सन्मान केला. विद्यार्थ्यांनी केक कापुन शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थांनी शिक्षक बनून आपापल्या विभागातील विद्यार्थ्यांना वर्गात जाऊन ज्ञानाचे धडे दिले. या मधून चांगल्याप्रकारे ज्या विद्यार्थ्याने शिकविले त्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व गुलाब देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील शिक्षकांचे पुष्पगुच्छ, पेन देऊन सन्मान केला.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या विविध विभागातील कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. विविध विभागात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहार उपस्थितांना देण्यात आला.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________







0 Comments