श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा !
पंढरपूरः ‘पालक तुम्हाला नाव देतात पण शिक्षक तुम्हाला ज्ञानदानातून तुमची स्वतःची ओळख निर्माण करून देतात. आयुष्याच्या प्रत्येक
टप्प्यावर आपण वेगवेगळ्या परीक्षांना सामोरे जात असतो. हिर्याला त्याची ओळख निर्माण करून देण्यासाठी प्रकाशाची गरज असते
तसे विद्यार्थ्यांना शिक्षक रुपी प्रकाशाची अत्यंत आवश्यकता असते. महाभारतामध्ये जसे अर्जुनाने श्रीकृष्णाठायी स्वतःला समर्पित केले तसे
तुम्ही शिक्षकांठायी समर्पित व्हावे. यासाठी तुमच्या इच्छांचे रूपांतर त्यागात करा. ‘स्वेरी’ ही माझी कर्मभूमी असून स्वेरीने मला घडवले.
यामुळे आज मी जो काही आहे ते स्वेरीमुळेच आहे. शिक्षक ही अशी व्यक्ती आहे, जी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सतत त्याग
करत असते.’ असे प्रतिपादन अॅटलास कोपको इंडिया लिमिटेडचे कार्पोरेट मानव संसाधन व्यवस्थापक कबीर गायकवाड यांनी
‘शिक्षक दिनी’ केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर
संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मध्यवर्ती असलेल्या अॅम्पिथिएटरमध्ये भारतरत्न
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त आयोजिलेल्या ‘शिक्षक दिना’च्या
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अॅटलास कोपकोचे व्यवस्थापक गायकवाड हे विद्यार्थी व
प्राध्यापकांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपविभागीय अधिकारी
डॉ. सागर कवडे हे होते.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अॅटलास कोपकोचे व्यवस्थापक गायकवाड हे विद्यार्थी व
प्राध्यापकांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपविभागीय अधिकारी
डॉ. सागर कवडे हे होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
भारतरत्न डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनींनी ‘शिक्षकदिना’चे
महत्व आपल्या विचारातून पटवून सांगितले. स्वेरीचे माजी विद्यार्थी व टॉपर्स अकॅडमीचे प्रा.गणेश धांडोरे, प्रा.संकेत पवार, स्वेरीचे संस्थापक
सचिव आणि अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी रोंगे यांनी ‘शिक्षक कसा असावा आणि त्यांचे योगदान काय आहे ? हे सांगितले. अध्यक्षीय
भाषणातून पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे म्हणाले की, ‘प्रत्येक वळणावर शिक्षकांचा आदर केला पाहिजे. तुमच्यातील
क्षमता ओळखतो आणि त्या योग्य क्षमतेला वाव देतो तोच खरा शिक्षक. असे शिक्षक आपल्याला ओळखता आले पाहिजेत.’
असे सांगून डॉ.कवडे यांनी आपल्या प्रशिक्षण काळात गडचिरोलीमध्ये आलेला अनुभव सांगताना ‘संकटाचा सामना करण्यासाठी निधड्या
छातीने पुढे गेले पाहिजे. ’ असे सांगून शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईनच्या उतारवयातील एक घटना सांगून ‘आयुष्यभर विद्यार्थी होऊन ज्ञान घ्यावे.
’ असे आवाहन केले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयाचे प्राचार्य, पीएचडी प्राप्त करणारे प्राध्यापक तसेच उत्कृष्ट
शोध निबंधासाठी निवड करण्यात आलेल्या प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये स्वेरीचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, डॉ. प्रशांत पवार,
डॉ.ए.एस.विभुते, डॉ. श्रीदेवी, डॉ. रणजीत गिड्डे, डॉ. मीनाक्षी पवार, डॉ.संताजी पवार, डॉ.एम एम आवताडे, डॉ.संदीप वांगीकर, डॉ.व्ही.एस. क्षीरसागर, डॉ.मिथुन मणियार, डॉ. दिप्ती तंबोळी, प्रा. संजीवनी कदम, प्रा.एच.एम. तांबोळी, प्रा. एस. एम. पाटील, प्रा. महेश मठपती, डॉ. बी.सी. मिलीमठ, डॉ. भुवनेश्वरी, प्रा.संदीपराज साळुंखे, प्रा.एच. एस. पवार, प्रा. यशपाल खेडकर, प्रा.प्राजक्ता खुळे, प्रा. वृणाल मोरे, या प्राध्यापकांचा व रजिस्टर राजेंद्र झरकर यांचा समावेश आहे. यावेळी स्वेरीची ‘सुजनरंग’ या वार्षिक नियतकालिकेच्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापुरमध्ये तृतीय क्रमांक आल्यामुळे ‘सुजनरंग’च्या
संपादकीय विभागाचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वस्त प्रा. सुरज रोंगे,
स्वेरींअंतर्गत असलेल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग
व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी दिवसभर महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थी हे
प्राध्यापकांना शुभेच्छा देत होते. सुत्रसंचालन प्रा.यशपाल खेडकर यांनी केले तर स्वेरीचे जेष्ठ

विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments