पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग विभागातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागात "व्हर्च्युअल कॅम्पस" चे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होते.
या वेळी या व्हर्च्युअल कॅम्पस चे उदघाटन डाॅ. राजश्री बाडगे, प्रा. समीर कटेकर, प्रा. सुंधा सुरवसे, प्रा. जी. बी. बिराजदार, विद्यार्थी
प्रतिनिधी दत्तात्रय घाडगे आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन स्टुडंट असोसिएशन आणि नामांकित कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थी यांच्या कडून व्हर्च्युअल कॅम्पस चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डाॅ. राजश्री बाडगे, प्रा. समीर कटेकर, प्रा. सुंधा सुरवसे यांनी मार्गदर्शन केले.
यामध्ये अॅप्टीट्युड टेस्ट, ग्रुप डिस्कशंन आणि मुलाखत ह्या तीन टप्प्यात ही स्पर्धा संपन्न झाली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नामवंत कंपनीच्या तज्ञांकडून मुलाखती घेण्यात आल्या. दरम्यान तज्ञांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या व्हर्च्युअल कॅम्पस मध्ये नामांकित कंपनीत निवड झालेले शुभम हिवरकर व वैभव कोळवले यांनी विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल कॅम्पस म्हणजे काय ? या विषयी महत्वाची माहिती दिली. व्हर्च्युअल कॅम्पस मुळे विद्यार्थ्यांना कंपनीत निवड करण्याच्या प्रक्रिया काय असतात, कंपनीत निवड होण्यासाठी आवश्यक गुण, मुलाखत देण्याची पद्धत, समूह चर्चा कशी करावी याबद्दल महत्वपूर्ण माहिती सहभागी विद्यार्थ्यांना दिली.
या व्हर्च्युअल कॅम्पस मध्ये महाविद्यालयातील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला होता. या व्हर्च्युअल कॅम्पस मधून निवड झालेले विद्यार्थ्यांना प्रमाणपञ व स्मृतीचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुञसंचालन कुमारी गिरीजा दामोदरे व वैष्णवी गुलाखे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. सुंधा सुरवसे यांनी मानले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments