पंढरपूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १६ वा ‘उन्मेष सृजनरंगा’चा हा युवा महोत्सव लोकमंगल वडाळा येथे नुकताच संपन्न झाला. या महोत्सवात रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाने सहभाग घेवून विशेष कामगिरी केली. या महोत्सवात एकूण दहा कला प्रकारातील प्रथम, द्वितीय व तृतीय पातळीवरील बक्षीसांसह ११ गुणांसह संगीत विभागाची चॅम्पीयनशीप प्राप्त केली. याबद्दल युवा महोत्सवातील सहभागी विद्यार्थी कलाकारांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांनी अभिनंदन व कौतुक केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
‘नकला’, ‘एकांकिका रंगमंच संयोजन’ व ‘फोक आर्केस्ट्रा’ यामध्ये प्रथम, सुगम गायन, स्थळचित्र, मातीकाम, लघुनाटीका यात द्वितीय तर शोभायात्रा व इंग्रजी वक्तृत्व या प्रकारात तृतीय क्रमांक प्राप्त केले. दिनेश मेटकरी, गीता जोगदंड, राधा जोगदंड, अथर्व सिताप, विशाल बडके, प्रांजली जाधव, सुनील कर्वे, सागर नाईकनवरे, दीपक गुंजाळ, सत्यजीत देशमुख, गायत्री भगत, रसिका कुलकर्णी, मुस्कान तांबोळी, चिन्मयी तळेकर, प्राजक्ता जाधव, मनोज लवटे, साई रणदिवे, कार्तिकेय होडगे, समृध्दी सांवजी, प्रसाद बेलकर, वैभव लोंढे, वेदांत कर्पे, कृतिका महिमकर, ज्ञानेश्वरी पवार, राणी सिध्दवाडकर, राणी निंबाळकर, सुरभी पांढरे, प्रेरणा परदेशी, रामेश्वर जाधव, कार्तिक माळी, वैभव शेंडे, अजय बनसोडे, रुपाली व्हनमाने, विकास जाधव, अमोल माने व दुर्गेश काळुंके या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना युवा महोत्सव समितीचे चेअरमन प्रा. डॉ. प्रशांत नलवडे, संघ व्यवस्थापक प्रा. डॉ. दत्ता डांगे यांनी मार्गदर्शन केले. तर प्रा. अलका घोडके, प्रा. सुरेखा भालेराव व समाधान बोंगे यांनी विशेष परिश्रम घेतले. युवा महोत्सवातील या यशाबद्दल सांस्कृतिक विभाग प्रमुख उपप्राचार्य डॉ. विकास कदम, उपप्राचार्य डॉ. एन. एन. तंटक, उपप्राचार्य अशोक चंदनशिवे, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी व विद्यार्थ्यिनींनी अभिनंदन केले.
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________





0 Comments