पंढरपूर – “डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे बहुआयामी व्यासंगी शिक्षक होते. त्यांनी अवितरपणे ज्ञानाची उपासना केली. केवळ ज्ञानाच्या बळावर ते आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती मिळवू शकले. भारतीय राजकारणात त्यांनी खूप प्रभावीपणे कार्य केले. त्यांचा आदर्श शिक्षकांनी घेऊन अखंड ज्ञानसाधना करावी. शिक्षक हे राष्ट्राचे निर्माते आहेत. याची जाणीव आपण सातत्यपूर्ण ठेवली पाहिजे.” असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य सेवानिवृत्त प्राचार्य आर. के. शिंदे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात आयोजित शिक्षक दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचकावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जाधव, ग्रामीण साहित्यिक डॉ.द.ता.भोसले, सुभाषआबा सोनवणे, प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, प्रा.आर.वाय.जाधव, प्राचार्य डॉ. डी. जी.साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्य आर.के .शिंदे म्हणाले की, “डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करताना आपण जे. पी. नाईक यांची आठवण ठेवली पाहिजे. शिक्षणासंबंधीच्या सर्वश्रेष्ठ डॉ. कोठारी आयोगाचा अहवाल लिहिण्याचे कार्य जे. पी. नाईक यांनी केले. ख्रिश्चन मिशनरीच्या शाळांमध्ये शिकत असताना धर्माबाबतची टिका त्यांनी ध्यानात घेवून हिंदू धर्मासह जैन, बौध्द, पारसी व मुस्लिम धर्माचा त्यांनी अभ्यास केला.
भारतीय जीवन पध्दतीमधील धर्म आणि संस्कृतीबाबतचा सखोल अभ्यास राधाकृष्णन यांनी केला. विद्ववत्तेच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य हे आदर्शवत आहे. सामान्य शिक्षकांपासून सुरु झालेल्या प्रवासात ते अंतिमत: देशाचे राष्ट्रपती म्हणून कार्यरत राहिले.”
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
अध्यक्षीय भाषणात डॉ. राजेंद्र जाधव म्हणाले की, “शिक्षक हा सातत्यपूर्ण कार्यरत असणारा घटक असून देशाच्या जडणघडणीत त्याची महत्वाची भूमिका असते. बदललेली शैक्षणिक धोरणे विचारात घेता शिक्षकांनी स्वत:चे आरोग्य जपणे आवश्यक आहे. आहार, विहार व व्यायाम या बाबी महत्वाच्या असून शिक्षकांनी ताण-तणाव मुक्त राहिले पाहिजे. तणावाचे नियोजन करुन आरोग्य जपणे गरजेचे आहे.” त्यासाठी डॉ. जाधव यांनी शिक्षकांना आरोग्यविषयक महत्वाच्या बाबी सांगितल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विकास कदम यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक, सिनिअर, ज्युनिअर, व्होकेशनल विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. एस.पवार, प्रा. के.पी.गायकवाड, प्रा. अलका घोडके यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. हणमतराव लोंढे यांनी मानले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________





0 Comments