पंढरपूर सिंहगड मध्ये "इनक्युबेशन सेंटर" चे उदघाटन
पंढरपूर (प्रतिनिधी) जीवनात यश प्राप्त करायचे असेल तर विद्यार्थ्यांनी स्वतः मधील कौशल्य ओळखले पाहिजे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी स्वतःच्या करिअरसाठी स्वप्न बघितलं पाहिजे आणि ते स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली तर आयुष्यात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी, सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असुन तुम्ही तुम्हाला आवड असलेल्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी धडपड केली पाहिजे. यामध्ये चांगल्या कंपनीत नोकरी, क्लास वन, क्लास टू ऑफिसर जे तुमचं स्वप्न आहे ते स्वप्न पुर्ण करण्यासाठी मेहनत शिवाय पुर्ण होऊ शकत नाही. म्हणून आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर अगोदर विद्यार्थ्यांनी स्वप्न बघितले पाहिजे असे मत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी "इनक्युबेशन सेंटर" च्या उदघाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात "इनक्युबेशन सेंटर" चे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. चेतन पिसे, ॲकॅडमी डीन डाॅ. रविंद्र व्यवहारे, डाॅ. स्वानंद कुलकर्णी, काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत, प्रा. अमोल जगदाळे आदीच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात आली.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आलेे. दरम्यान प्रा. अमोल जगदाळे यांनी एल सी डी स्क्रीन द्वारे उपस्थित विद्यार्थ्यांना "इनक्युबेशन सेंटर" विषयी माहिती दिली. ॲकॅडमी डीन डाॅ. रविंद्र व्यवहारे , डाॅ. स्वानंद कुलकर्णी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्याना त्यांच्या प्रकल्पांना समाज उपयोगी उपकरणामध्ये रुपांतर करण्यास आर्थिक मदत होणार आहे. प्रकल्प तयार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार असुन विद्यार्थ्यांना या "इनक्युबेशन सेंटर" खुप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुञसंचालन शिवानी नागणे व आभार प्रदर्शन कु. शितल मुडंलिक यांनी केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________







0 Comments