आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींमधून सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाली राम बांगड यांच्या भावना


 महेश प्रोफेशनल फोरमतर्फे महेश गौरव -२०१९ पुरस्कार वितरण सोहळ््याचे आयोजन; राम बांगड, पुष्पा तोष्णीवाल यांना पुरस्कार प्रदान

   पुणे : कोणत्याही वेळी रक्तदानासाठी तयार असलेले माझे रक्तदाते, नातेवाईक, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला अशा सर्व माणसांना हा पुरस्कार मी अर्पण करतो. आयुष्याचे मोजमाप त्याच्या वयावरून करण्यापेक्षा त्याने नाती कशी बनवली आणि टिकवून ठेवली यावरून त्याच्या आयुष्याचे मोजमाप व्हायला हवे. माझे आई-वडील माझ्यासाठी प्रेरणास्थाने आहेत. तसेच अनेकांकडून मला माझे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींमधून सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाली, अशा भावना रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे राम बांगड यांनी व्यक्त केल्या. 


   महेश प्रोफेशनल फोरमतर्फे समाजातील विविध घटकांमध्ये आपले योगदान देणा-या सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी महेश गौरव-२०१९ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन कोथरुड येथील एमआयटीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात करण्यात आले होते.

 यावेळी रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम बांगड, अखिल भारतीय माहेश्वरी मंडळाच्या प्रदेश समितीच्या ग्रामविकास प्रभारी पुष्पा तोष्णीवाल यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

   सन्मानचिन्ह, शाल, तुळशीचे रोप असे पुरस्काराचे स्वरुप होते. महेश प्रोफेशनल फोरमचे विमल कर्नानी, एम. एल. बाहेती, निकेत मंत्री, निखील खेतावत, डॉ.नवनीत मानधनी, सौरभ सोडानी, सीए दिनेश मुंदडा, अभिषेक सोडानी, जुगल मालू,  निर्मल तोष्णीवाल, नैनेश बेहेडे, गिरीष गिल्डा, पंकज झंवर, अंशु मुंदडा, सचिन धूत उपस्थित होते. पुरुषोत्तमजी लोहिया, कांता तोष्णीवाल आणि महेश सहकारी बँक यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. 



  राम बांगड म्हणाले, लहानपणी मी वसाहतीत रहात असे. वडील सायकलवर प्रवास करून काम करीत असत. घरासाठी, शिक्षणासाठी आईने सगळे दागिने विकले. मी ग्रॅज्युएट होईपर्यंत आई खोटे मंगळसूत्र वापरत होती. पण तिने याबद्दल वडीलांना कधीच सांगितले नाही. संयम हाच माझा दागिना असे आईने मानले. त्यामुळे हीच माझी प्रेरणा आहे.   

_________________________________________________


_________________________________________________



   पुष्पा तोष्णीवाल म्हणाल्या, हा पुरस्कार मिळाल्याने अजून कार्य करण्याची जबाबदारी वाढली असून यातून प्रेरणा मिळाली आहे. हा महिला शक्तीचा, महिला एकतेचा सन्मान आहे. 

   पंकज झंवर म्हणाले, महेश प्रोफेशनल फोरमतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. माहेश्वरी समाजातील सर्व मंडळी एकत्र येऊन विविध प्रकारचे कार्य करतात. तसेच समाजामध्ये महत्वपूर्ण योगदान देणा-या व्यक्तींना महेश गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 

_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments