जबरी चोरी करणाऱ्या टोळीस पंढरपूर शहर पोलीसांनी तातडीने केले जेरबंद केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याची सुत्रे हाती घेतल्यापासून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करत गुन्हेगारी वर्तुळावर खाकीचा चांगलाच दरारा निर्माण करण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या कामाचे सर्वसान्यांमधुन कौतुक होताना आढळत आहे.
जबरी चोरी प्रकरणातील टोळक्यास शिताफीने अटक..
दिनांक 13- 9 -2019 रोजी नवनाथ बिभीषण थोरात (वय वर्षे 34), राहणार आढीव, तालुका पंढरपूर व त्यांचे मित्र किरण युवराज सोनवणे राहणार चिंचोली भोसे, तालुका पंढरपूर असे पवार मळा येथून संतोष पवार यांच्यासोबत झालेल्या मोटरसायकलचा व्यवहार पूर्ण करून त्यांच्याकडून पंधरा हजार रुपये घेऊन पंढरपूर येथील कुंभार गल्ली येथे राहणारे नवनाथ थोरात यांचे सासरे संजय जगताप यांचे घरी निघाले असताना त्यांना जुना अकलूज रोड जकात नाका पंढरपूर येथे मोटरसायकलवर आले असताना तिथे अनोळखी इसमाने त्यांना हात करुन थांबवले व आमच्या गणपतीचा ट्रॅक्टर बंद पडला आहे तो ढकलण्यासाठी तुम्ही चला असे म्हणून बायपास रोडवर चंद्रभागा स्टॅंडवर नंबर नसलेल्या एक युनिकॉर्न व एक फॅशन मोटरसायकल वर घेऊन गेल्यावर त्या चौघांनी त्या दोघांचे मोबाईल,मोटर सायकल घेतली दोघांना बसवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून नवनाथ थोरात त्यांच्याकडील वीस हजार चारशे रुपये व किरण सोनवणे यांच्याकडून साठ रुपये जबरदस्तीने काढून घेतले त्यांना पुन्हा मारहाण केली. त्यानंतर त्या दोघांना पोलीस ठाण्यास गेला तर तुम्हाला पंढरपुरात फिरकू देणार नाही असा दम दिला त्यानंतर त्यांचे मोबाईल परत केले व ते चौघेजण त्यांच्यावरील मोटरसायकलवर बसून निघून गेले.
सदरचा प्रकार रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान घडला याबाबत नवनाथ बिभीषण थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी तपास केला असता चार जण जुना अकलूज रोड हद्दीत एका शेतात बसल्याचे बातमी मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला.
ते पळून जात असताना त्यात 4 पैकी तिघांना पोलिसांनी पकडले व एक जण तिथून पळून गेला सदर इसमांची नावे महादेव बाळू काळे राहणार पंढरपूर, विनोद चंदू काळे जुनी वडर गल्ली पंढरपूर, सूर्यकांत ज्योतीराम माने मेकॅनिकल लाईन पंढरपूर असे सांगितले. त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबूल केले असून सदर गुन्ह्यात गेलेली रक्कम वीस हजार चारशे रुपये जप्त करण्यात आले आहेत. सदर आरोपींपैकी महादेव बाळू काळे याचे विरुद्ध गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींना अटक करण्यात आली असून अटक आरोपी महादेव बाळू काळे यांनी अशा अशा प्रकारचे अनेक गुन्हे केले असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने अधिक तपास करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर विभाग डॉ सागर कवडे, यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे , वनी प्रकटीकरण शाखेचे सह नवनाथ गायकवाड, सहापो फौजदार हनुमंत देशमुख, पो हेकॉ सुजित उबाळे,पो हेकॉ बिपिनचंद्र ढेरे,पो.ना.मच्छिंद्र राजगे,पो.ना.सतीश चंदनशिवे ,पो.ना.अभिजीत कांबळे ,पो.ना.प्रसाद औटी, पो.ना.शोएब पठाण ,पो. कॉ. प्रवीण पाटील,पो.कॉ. सुजित जाधव यांनी केले असून याबाबत पुढील तपास पो.हे.कॉ. सुजित उबाळे पंढरपूर शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments