स्वेरीमध्ये सेसाच्या माध्यमातून साकारल्या जगातील प्रसिध्द इमारतींच्या हुबेहूब प्रतिकृती !
पंढरपूर- ‘स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच नेतृत्व, व्यवस्थापन आणि संघटन कौशल्य हे गुण अंगीकारणे ही काळाची गरज असून बांधकाम क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान वापरून बांधकामांची वयोमर्यादा वाढविता येणे शक्य झाले आहे. यासाठी सिव्हील इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी बांधकाम क्षेत्राशी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष जावून बांधकामाचा अभ्यास करावा. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून केलेला अभ्यास विशेष परिणाम जनक असतो.’ असे प्रतिपादन रियल इस्टेटचे डेव्हलपर अभिनव साळुंखे यांनी केले.
स्वेरीमध्ये आज ‘सेसा (सिव्हील इंजिनिअरींग स्टुडंट असोसिएशन) २के१९’ चे आयोजन केले होते याच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रियल इस्टेटचे डेव्हलपर अभिनव साळुंखे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. प्रारंभी सेसाचे विद्यार्थी अध्यक्ष प्रमोद आटकळे यांनी या उपक्रमाचे आयोजानाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी स्वेरीचा संपूर्ण सिव्हील इंजिनिअरींग विभाग विशेष सजला होता. महाविद्यालयाच्या प्रवेश द्वाराजवळ प्रसिद्ध चार मिनारची प्रतिकृती साकारली होती. यामध्ये विभागाच्या प्रवेशद्वारापासून स्वतंत्र वर्गात विविध बांधकामाचे नमुने साकारले होते. विद्यार्थ्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी मधील विविध विषयांवर मॉडेल्स तयार केले होते. यामध्ये हडप्पा संस्कृती, अंडर ग्राउंड मेट्रो, सस्पेन्शन ब्रीज, मोठमोठ्या धरणांची प्रतिकृती, रोड नेटवर्क, शहराची प्रतिकृती, फिरती इमारत, हैड्रोलीक ब्रीज, ग्रीनबस स्टँड, बांद्रा-वरळी सी लिंक ब्रीज, आर्मी कॅम्प, स्वेरी महाविद्यालयाची प्रतिकृती, झुकता मनोरा, आयफेल टॉवर असे विविध मॉडेल्स तयार करून विद्यार्थ्यांनी संपूर्ण सिव्हील विभाग आकर्षक बनविले होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
आकर्षक शिवस्मारक व सिंधूदुर्ग किल्ला सुद्धा साकारला होता. बांधकामाच्या विविध प्रतिकृती पाहण्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थी एकच गर्दी करून माहिती जाणून घेत आहेत. विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार, सेसाचे समन्वयक प्रा. सद्धाम पठाण, विद्यार्थी सहसमन्वयक रोहित बाडगुडे व शिवा गंगा, उपाध्यक्षा अमृता गडदे, सचिव सुशांत शिंदे, सहसचिवा शिवानी बेणारे, खजिनदार शुभम विटेकरी व आशिश बुराडे यांच्या नेतृत्वाखाली सिव्हील इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण विभाग सुशोभित केला होता सर्वत्र रंगीबेरंगी फुगे, पताका याची रोशनाई केली होते.
स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी केलेली कलाकृती पाहण्यास मरवडे, सुस्ते, कासेगाव, आटपाडी मधील शाळेतील विद्यार्थी आले होते. यावेळी संस्थचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा, उपाध्यक्ष आर. बी. रिसवडकर, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त डी.एस. सालविठ्ठल, विश्वस्त ए.व्ही.जाधव, संस्थापक जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त एच.एम. बागल, विश्वस्त बी. डी. रोंगे, विश्वस्त ए. एल. भोसले, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थ्यांनी ‘सेसा’ प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थ्यांनी केलेल्या कलेचे कौतुक केले. सुत्रसंचालन वैष्णवी रोटे व प्रतिक सावंत यांनी केले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________





0 Comments