दि. 14/9/2019 रोजी पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेमध्ये हिंदी दिन साजरा करण्यात आला.
भारताची राष्ट्रभाषा हिंदी हि सर्वमान्य आहे. भारत हा विविध परंपरेने नटलेला तसेच अनेक प्रांत असलेला देश आहे.प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी बोली भाषा बोलल्या जातात , परंतु ज्यावेळी एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतामध्ये जावे लागते, त्यावेळी गरज पडते ती संवादाची. परंतु भाषा वेगवेगळी असल्यामुळे त्याचा सुवर्णमध्य साधला जातो तो आपल्या राष्ट्रभाषेने ती म्हणजे हिंदी भाषचे महत्व समजावून देण्यासाठी हिंदी दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व कवी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले. दीप प्रज्वलन प्रशालेच्या प्राचार्या शैला कर्णे`कर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी हिंदी भाषेचे महत्व प्राचार्या शैला कर्णेकर मॅडम यांनी समजावून दिले त्यानंतर हिंदीतून विद्यार्थ्यांनी स्वागतगीत गायले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
हिंदी दिन साजरा करणे प्रसंगी प्रशालेमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये हिंदीचे महत्त्व प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विनोदी लघुनाटिका च्या माध्यमातून दाखवून दिले. यावेळी आपली कला सादररकरत प्रशालेचे शिक्षक मंगेश भोसले सर व गहिनीनाथ कचरे यांनी हिंदी भाषेचे महत्व चारोळ्यातून दाखवले. या कार्यक्रमांमध्ये समृद्धी ताठे, केतकी जोशी ,कैवल्य बडवे, अथर्व अमंगे uया विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी समृद्धी पवार, रविराज मस्के आभार यांनी मानले.या कार्यक्रमाचे नेतृत्व प्रशालेचे हिंदी शिक्षिका सारिका बनसोडे मॅडम, प्रदीप नागरगोजे, राहुल काळे सर यांनी केले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्या शैला कर्णेकर मॅडम, रजिस्टर श्री गणेश वाळके साहेब, श्री.राजेंद्र सावंत सर यांनी केले तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम केले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________










0 Comments