पंढरपूर सिंहगड मध्ये इलेक्ट्रिका २के १९ उत्साहात संपन्न



पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागात इंजिनिअर्स डे औचित्य साधून "इलेक्ट्रिका २ के १९ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हि स्पर्धा उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

या स्पर्धेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेइलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. श्रीनिवास गंजेवारशिक्षक प्रतिनिधी प्रा. लोकेश स्वामीप्रा. शशिकांत गिड्डेविद्यार्थी प्रतिनिधी प्रशांत सावंत आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व इंजिनिअर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. श्रीनिवास गंजेवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय इलेक्ट्रिका २ के१९ या स्पर्धेत क्विझमाइंड ब्लास्टर आदीसह अनेक इतर  स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत महाविद्यालयासह इतर महाविद्यालयातील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना  महाविद्यालयाच्या वतीने प्रमाणपञसन्मान चिन्ह व बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

या कार्यक्रमाचे सुञसंचालन कुमारी मनाली चव्हाणकुमारी गीतांजली जठार यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु. सुरज राऊत यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले


           _________________________________________________






_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments