पंढरपूर सिंहगड मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील कार्यशाळेत मार्गदर्शन करताना
रोहित दणके समोर उपस्थित विद्यार्थी वर्ग.
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागात पीसीबी डिझाईन या विषयावर तीन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. श्रीनिवास गंजेवार यांनी दिली.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्केट मध्ये येणा-या टेक्नाॅलाॅजी ची माहिती देण्यात येणार आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात नव-नवीन तंत्रज्ञान अवगत होत असुन या तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना माहिती होणार असुन नवीन प्रकल्प तयार करण्यासाठी आवश्यक डिझाईन कसे तयार करायचे या विषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येईल. एखादा प्रकल्प तयार करण्यासाठी तो सॉफ्टवेअर मध्ये कसा आणायचा याविषयी महत्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे या कार्यशाळेत समाजातील विविध घटकाला उपयोग होईल अशा गोष्टीची जास्त माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. उदा. शेतक-यांसाठी विहिरीतील पाणी संपले की विद्युत मोटार आपोआप बंद झाली पाहिजे, अंधार झाली की घरातील, समोरील ल अन्य आवश्यक ठिकाणचा विद्युत पुरवठा म्हणजे लाईट आपोआप सुरू झाल्या पाहिजेत, रूम उघडल्यावर पंखे, बल्ब, ए. सी. आपोआप सुरू तर रूम बंद केले की आपोआप बंद झाले पाहिजेत. अशा विविध गोष्टी या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर च्या माध्यमातून रोहित दणके सांगणार आहेत.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments