स्वेरीमध्ये प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियानाचा पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न


स्वेरीमध्ये प्र.ज.यो.प्र.प्र.अभियानच्या पदाधिकारी मेळाव्याचे उदघाटन करताना अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष भरत कात्यायन सोबत पंढरपुरचे माजी आमदार व एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद कराडमिशन मोदी अगेन पी.एम.चे प्रदेशाध्यक्ष व स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूरचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे सर व आदी मान्यवर
पंढरपूर- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१४ सप्टेंबर २०१९ ते २३ सप्टेंबर २०१९ या कालावधी दरम्यान ‘सेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आलेला आहे. सेवा सप्ताहाचाच एक भाग म्हणून गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या भव्य आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियान (प्र.ज.यो.प्र.प्र.अ.) कोल्हापूर विभागाचा पदाधिकारी मेळावा अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष भरत कात्यायन यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यातील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता भारतीय जनता पार्टीचे (भा.ज.पा.) राष्ट्रीय उपाध्यक्ष व प्र.ज.यो.प्र.प्र.अ.चे प्रमुख मार्गदर्शक श्यामजी जाजू यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विशेष मार्गदर्शन केले. या अभियानात कोल्हापूर विभागाअंतर्गत मेळावा घेण्यात आला असून कोल्हापूर विभागात सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर हे जिल्हे येतात या मेळाव्याची संपूर्ण जबाबदारी सोलापूर जिल्ह्याकडे होती आणि ती व्यवस्थित पार पडली. हा मेळावा दोन सत्रात आयोजित करण्यात आला होता. 

           प्रास्तविकात या अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष भरत कात्यायन यांनी या अभियानाची सुरुवात, अभियानाचा हेतू तसेच या अभियानाची गरज का आहे हे स्पष्ट केले. त्याचबरोबर राष्ट्रीय महामंत्री अंकित संचेतीराष्ट्रीय सदस्य विवेक देशपांडेराष्ट्रीय समन्वयक विनय वर्मा व राष्ट्रीय पातळीवरील विविध पदाधिकाऱ्यांनी या प्र.ज.यो.प्र.प्र.अभियानाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. यावेळी पंढरपुरचे माजी आमदार व एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारकमाजी मंत्री, पाटबंधारे विभाग अजितराव घोरपडेधैर्यशील मोहिते पाटील यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या सरकारी कामांचे किस्से ऐकवले व या अभियानातून ‘मोदींच्या योजना गोरगरिबांच्या घरात पोहचतील’ अशा अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी व्यासपीठावर सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत ‘मिशन मोदी अगेन पी.एम.चे प्रदेशाध्यक्ष व स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूरचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे सर म्हणाले की, ‘प्रथम आपण सर्वांनी मोदी बनले पाहिजे, म्हणजेच सर्वांनी दररोज जवळपास १४ ते १८ तास काम केले पाहिजे. त्यापैकी काही तास समाज घडविण्यासाठी दिले पाहिजे. प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रचंड परिश्रम यांच्या जोरावर माणूस कोणताही चमत्कार घडवू शकतो.’

        या मेळाव्याच्या द्वितीय सत्रात सोलापूर, कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांनी आपली मनोगते मांडली. यामध्ये दिग्विजय पाटील, श्रीनिवास जाधव, सुरज मस्के व दिपक बर्गे यांचा समावेश होता. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद कराड यांनी शेवटच्या सत्रात तडाखेबाज भाषण देत कार्यकर्त्यांची व उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले ‘सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी निरपेक्षपणे कार्य करावे. सर्वात अगोदर ‘देशाचे हीत’ पहावे आणि त्यानंतर ‘आपला पक्ष’ आणि सर्वात शेवटी ‘मी’ या धोरणाने सर्वांनी कार्य करावे. आपल्या देशातील युवा वर्गच देशासाठी बहुमोल योगदान देऊ शकतो. त्यामुळे सर्व तरुण कार्यकर्त्यांनी सतत कार्यशील राहावे.’ या मेळाव्यास प्रदेश महामंत्री राजेश गायकरप्रदेश मंत्री मयुर वैद्य यांच्यासह प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसार अभियानाचे विविध पदाधिकारी, पश्‍चिम महाराष्ट्राच्या सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यातून आलेले विविध कार्यकर्ते असे मिळून जवळपास ३०० हून अधिक  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यात राष्ट्रीय, राज्य व जिल्हा पातळीवरील विविध पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अक्षय वरपेसुरज मस्के, प्रा.सुरज रोंगे सर, स्वप्नील शहाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मेळाव्याचे आयोजन उत्तम पद्धतीने केले होते.या अभियानाच्या पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन स्वेरीचे प्रा.यशपाल खेडकर यांनी केले तर सोलापूर जिल्ह्याच्या प्रधानमंत्री जलकल्याणकारी योजना प्रचार-प्रसार अभियानाचे सरचिटणीस व स्वेरीचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे सर यांनी आभार मानले, तर मेळाव्याच्या दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन स्वेरीचे प्रा. सुनील भिंगारे यांनी केले तर सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरज मस्के यांनी आभार मानले.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________

_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments